जळगाव – सी एस आई आर तर्फे राष्ट्रीय स्तरावरून दिला जाणारा इनोव्हेशन अवार्ड फॉर स्कूल चिल्ड्रन 2020 यात विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड स्कूलचा इयत्ता नववीतील विद्यार्थी अर्चित राहुल पाटील यास चौथ्या क्रमांकाचे बक्षीस दिल्ली येथे देण्यात आले.
या बक्षिसासाठी शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण शास्त्रीय शोध किंवा कल्पना यांचा विचार करून राष्ट्रीय पातळीवर विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यानुसार अर्चित पाटील याने स्त्रियांसाठी पोस्ट पार्टम कप बनवून एक नाविन्यपूर्ण असे उपकरण तयार केले.
या उपकरणाद्वारे बाळंतपणामध्ये होणाऱ्या रक्तस्रावाचे प्रमाण मोजता येऊन अतिरिक्त रक्तस्रावामुळे मृत्यू होणाऱ्या मातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. त्या निमित्त शाळेतर्फे शाळेचे प्राचार्य श्री अमितसिंह भाटिया व समन्वयिक सौ. संगीता तळेले यांच्या हस्ते अर्चित पाटील व त्याच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.शाळेचे प्राचार्य, शाळेच्या विज्ञानाच्या शिक्षिका सौ संगीता खन्ना सुवर्णा सुर्वे , इम्रान खाटीक यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.