Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पूरग्रस्त कुटुंबांसाठी पाठविल्या जाणार्‍या जीवनावश्यक वस्तूंच्या किटची महापौरांकडून पाहणी

by Divya Jalgaon Team
September 11, 2021
in जळगाव, राजकीय, सामाजिक
0
पूरग्रस्त कुटुंबांसाठी पाठविल्या जाणार्‍या जीवनावश्यक वस्तूंच्या किटची महापौरांकडून पाहणी

चाळीसगावढ – ढगफुटीमुळे विविध नदी-नाल्यांना पूर येऊन चाळीसगावसह तालुक्यातील जवळपास 20 ते 25 गावांना त्याचा फटका बसला. यात अनेकांच्या घरांसह विविध व्यावसायिक दालनांत पुराचे पाणी शिरल्याने अतोनात नुकसान झाले. त्यामुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होऊन त्यांच्यावर रस्त्यावर येण्याची वेळ आली. या आपत्तीग्रस्त कुटुंबांकरिता सामाजिक दातृत्व निभावत आपले कर्तव्य समजून जळगाव शिवसेनेने शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, तसेच संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींना हाक दिली. या हाकेला स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद देत विविध संसारोपयोगी वस्तू सस्नेह देण्यासाठी अनेकजण सरसावले. यामध्ये एका कुटुंबाला साधारणपणे 15 ते 30 दिवस पुरेल एवढ्या संसारोपयोगी वस्तूंचे किट तयार करण्यात आले असून, ते 510 कुटुंबांना वितरीत केले जातील.

या किटची जळगावच्या प्रथम नागरिक तथा महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी पाहणी करून त्यांच्या पॅकिंगसंदर्भात संबंधितांना मार्गदर्शन केले. या उपक्रमासाठी शिवसेनेच्या नेत्यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी शिवसैनिक विराज कावडिया, अमित जगताप, प्रितम शिंदे, उमाकांत जाधव, पीयूष हासवाल व त्यांचे सहकारी उपस्थित होते. एकूण तीस युवकांच्या टीमने या 510 किट पॅकिंगच्या कामासाठी परिश्रम घेतले. हा उपक्रम यशस्वितेसाठी जळगाव शहरातील शिवसैनिकांचा मोलाचा वाटा आहे.

Share post
Tags: #Chalisgaon Heavy rain#Kulbhusan patil#mahapour mahajan#viraj kawdiya
Previous Post

राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभाग जळगाव(ग्रामीण) जिल्हाध्यक्ष पदी मजहर पठाण

Next Post

खांबाला अडकलेल्या चायना मांजामुळे सालार नगर येथील एका डॉक्टरचा गळा कापला

Next Post
खांबाला अडकलेल्या चायना मांजामुळे सालार नगर  येथील एका  डॉक्टरचा गळा कापला

खांबाला अडकलेल्या चायना मांजामुळे सालार नगर येथील एका डॉक्टरचा गळा कापला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group