जळगाव – मजहर पठाण यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग जळगाव जिल्हाध्यक्ष (ग्रामीण)पदी आज फेर निवड करण्यात आली असून प्रदेश अध्यक्ष मा.मोहम्मद पठाण व प्रदेश कार्याध्यक्ष जावेद हबीब (उत्तर महाराष्ट्र व विदर्भ प्रमुख) यांच्या संयुक्त नियुक्ती पत्र द्वारे मजहर पठाण यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
नियुक्ती पत्र मा.प्रदेश कार्याध्यक्ष जावेद हबीब व एजाज अब्दुल गफ्फार मलिक यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी भुसावळ शहर अध्यक्ष शोएब भाई,जिल्हा उपाध्यक्ष शकिर पिंजारी,जिल्हा उपाध्यक्ष महानगर मोहसीन शेख, मीडिया प्रमुख राजा मिर्झा,नागपूर वाले पाशा भाई और कार्यकर्ता उपस्थित होते.