Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

लायन्स क्लबच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा केशवस्मृती प्रतिष्ठानने केला सत्कार

by Divya Jalgaon Team
September 2, 2021
in जळगाव, सामाजिक
0
लायन्स क्लबच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा केशवस्मृती प्रतिष्ठानने केला सत्कार

जळगाव – केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने जळगाव शहरातील सर्व लायन्स क्लब अध्यक्ष व सचिवांचा सत्कार शहरातील लायन्स सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. लायन्सचे जळगाव शहरात ३ क्लब असून जळगाव शहरात लायन्स क्लब गेल्या ५ दशकापासून कार्यरत आहे.

केशवस्मृतीच्या स्थापनेला देखील ३० वर्ष पूर्ण झाले असून दोन्ही संस्था विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात त्यांची ओळख व लायन्सच्या निर्वाचीत पदाधिकाऱ्याना आगामी वाटचालीस शुभेच्छा असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. केशवस्मृतीचे प्रशासकीय अधिकारी श्री सागर येवले यांनी पॉवर पॉइंट प्रेझेन्टेशनच्या माध्यमातून गत ३० वर्षाची केशवस्मृतीची वाटचाल मांडत समाजावर केशवस्मृतीच्या कार्याचा झालेला परिणाम मांडला.

लायन्स क्लबच्या अध्यक्षा श्रीमती किरण यानी आपल्या मनोगतात केशवस्मृती प्रतिष्ठानच्या कार्याचा गौरव करत जळगाव शहरात जेथे कमी तेथे आम्ही या म्हणीनुसार निरंतर सामाजिक चळवळ उभी केली असल्याचे सांगत केशवस्मृतीने सर्व पदाधिकाऱ्यांचा गौरव करणे हि आम्हा सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले.

केशवस्मृतीचे अध्यक्ष भरत अमळकर यांनी सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत सामाजिक कामात दोन संस्था कार्यरत आहेत व त्यांनी परस्परांचा गौरव करणे हे कौतुकास्पद असून लायन्स क्लबच्या कामाची शिस्त, पाठपुरावा या गोष्टी आदर्शवत असल्याचे सांगत लायन्सच्या माध्यामतून आम्हाला अनिता कांकरिया सारख्या सामाजिक कार्यकर्त्या मिळाल्या असल्याचे सांगत सामाजिक कामाच्या नवनविन कल्पना समोर याव्यात हा या सत्कार सोहळ्याचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले.

यांचा झाला गौरव
नवनियुक्त अध्यक्ष, सचिव व कोषाध्यक्ष यांचा सत्कार केशवस्मृतीचे अध्यक्ष भरत अमळकर, सचिव रत्नाकर पाटील यांनी केला. १) लायन्स क्लब जळगाव, रोहित अग्रवाल, रामनारायण वर्मा २) लायन्स क्लब जळगाव सेंट्रल, जगदिश जाखेटे, विनोद गांधी ३) लायन्स क्लब जळगाव गोल्ड सिटी मनोज चांडक, गणेश तोतला, मनोज मालु रिजनल चेअरमन रविंद्र गांधी, झोनल चेअरमन जयेश ललवाणी, माजी रिजनल चेअरमन एच. एन. जैन, यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर केशवस्मृतीचे अध्यक्ष भरत अमळकर, सचिव रत्नाकर पाटील, मातोश्री आनंदाश्रम प्रकल्प प्रमुख सौ अनिता कांकरिया, मनिष मंडोरा, मनोज चांडक, श्रीमती किरण गांधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिता कांकरिया यांनी तर सूत्रसंचालन भानुदास येवलेकर यांनी केले. यशस्वितेसाठी विरभूषण पाटील, किशोर गवळी, गोपाळ तगडपल्लेवार यांनी परिश्रम घेतले.

Share post
Tags: #Keshsmruti pratishthan#lincense clubकेशवस्मृती प्रतिष्ठान
Previous Post

एकनाथराव खडसेंचा वाढदिवस आणि जयंतराव पाटलांचं आगळंवेगळं गिफ्ट…

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात पॅराग्लायडर्स, बलून उडविण्यास प्रतिबंध

Next Post
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात पॅराग्लायडर्स, बलून उडविण्यास प्रतिबंध

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात पॅराग्लायडर्स, बलून उडविण्यास प्रतिबंध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group