Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

एकनाथराव खडसेंचा वाढदिवस आणि जयंतराव पाटलांचं आगळंवेगळं गिफ्ट…

by Divya Jalgaon Team
September 2, 2021
in कृषी विषयी, जळगाव, राजकीय
0
एकनाथराव खडसेंचा वाढदिवस आणि जयंतराव पाटलांचं आगळंवेगळं गिफ्ट…

जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ,माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा आज वाढदिवस असून जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी त्यांना एक आगळंवेगळं गिफ्ट दिले आहे. तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या जळगाव जिल्ह्यातील वरणगांव तळवेल परिसर सिंचन योजनेंतर्गत आज ओझरखेड धरणात पाणी सोडण्यात आले. दरम्यान या कार्यक्रमात व्हर्च्युअल माध्यमातून जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे सहभागी झाले होते.

एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हतनुर धरणाच्या जलाशयातून ओझरखेडा धरणात पाणी टाकण्याचा जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते ऑनलाइन कळ दाबून शुभारंभ करण्यात आला. यावेळी जयंतराव पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरस द्वारे कार्यकर्त्यांना संबोधित केले

हतनूर जलाशयातून ओझरखेडा धरणात पाणी टाकण्याच्या कामाचे जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते ऑनलाइन उदघाटन करण्यात आले. यावेळी व्हिडीओ कॉन्फरस द्वारे संबोधित करताना जयंतराव पाटील म्हणाले जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी आग्रह धरून मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील उपसा सिंचन योजना आणि इतर प्रकल्पांची आढावा बैठक घ्यायला लावली त्या बैठकीत रोहिणी खडसे खेवलकर यांनी हतनुर जलाशयातून ओझरखेडा धरणात पाणी टाकण्याची आग्रही मागणी लावून धरली त्यानुसार अधिकाऱ्यांना निर्देश देऊन तातडीने तांत्रिक अडचणी दुर करण्यास सांगितल्या.

पुढे बोलतांना ना.जयंत पाटील म्हणाले की, आज रोहिणीताई खडसे यांच्या आग्रहाने मोटार ,विद्युत पुरवठ्याच्या तांत्रिक अडचणी सोडवून एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी हतनुर जलाशयातून ओझरखेडा धरणात पाणी सोडण्यात येत आहे. यानंतर दरवर्षी उन्हाळ्यात सर्व मोटार विद्युत पुरवठा याच्या चाचण्या घेऊन पावसाळ्यात सुरुवातलाच ओझरखेडा धरणात पाणी सोडण्यात येईल. एकनाथराव खडसे हे जलसंपदामंत्री असताना त्यांनी संपूर्ण खान्देशात विविध प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली एकनाथराव खडसे यांनी पाठपुरावा करून त्यातील बहुतांशी प्रकल्प पुर्ण केले गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत आम्ही जळगाव जिल्हयातील सर्व प्रकल्पांचा आढावा घेतला यातील बहुतांशी प्रकल्पांचे काम जवळपास पूर्णत्वास येत आहे त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यासाठी एकनाथराव खडसे, रोहिणीताई खडसे नेहमी आग्रही असतात टप्प्याटप्प्यात या प्रकल्पांना निधी उपलब्ध करून येत्या दोन वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न राहील

मागील आघाडी सरकारच्या काळात एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याने ओझरखेडा धरणाची उंची वाढविण्यात आली या धरणाच्या जलाशायतील पाणी मुख्यत्वे दिपनगर औष्णिक प्रकल्पासाठी राखीव ठेवण्यात आले होते त्यावेळी एकनाथराव खडसे यांनी आग्रह धरून ओझरखेडा धरणातील ५० टक्के पाणी ओझरखेडा धरण्याच्या बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी देण्यात यावे अशी मागणी लावून धरली होती त्यानुसार ओझरखेडा धरण्याच्या खालील गावातील शेतकऱ्यांना ओझरखेडा धरणातून बंदिस्त पाईप लाईन द्वारे पाणी उपसा करण्यासाठी परवानग्या देण्यात आलेल्या आहेत. एकनाथराव खडसे यांना मी वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो व आपले सर्वांचे प्रेम असेच एकनाथराव खडसे यांच्यावर कायम ठेवा असे ना.जयंत पाटील यांनी संबोधित करताना कार्यकर्त्यांना आवाहन केले.

यानंतर जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर, माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदना पाटील, महानगरअध्यक्ष अभिषेक पाटील,कल्पना पाटील, मंगला पाटील, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, सावदा नगराध्यक्षा अनिता येवले , प स सभापती सुवर्णा साळुंखे, किशोर गायकवाड,युवक जिल्हा अध्यक्ष रवींद्र नाना पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ,सरचिटणीस ईश्वर रहाणे,सोपान पाटील, अरविंद मानकरी,रमेश नागराज पाटील, राजेश वानखेडे, पंकज येवले, उमेश नेमाडे,सय्यद अजगर,अजय भारंबे,गोटू सेठ महाजन, निळकंठ चौधरी,राजु माळी,यु डी पाटील, नामदेव भड, निलेश पाटील, प्रदिप साळुंखे, विकास पाटील,दशरथ कांडेलकर, विलास धायडे,रामभाऊ पाटील , अशोक लाडवंजारी, दिलीप माहेश्वरी, अशोक पाटील,समाधान कार्ले, सुधाकर पाटील ,पवनराजे पाटील, दिपक पाटील, उद्धव पाटील, रामदास पाटील, मधुकर राणे, प्रदिप बडगुजर, शाहिद शेख, विशाल महाराज खोले,शिवराज पाटील, अनिल पाटील, अनिल वराडे, भरत अप्पा पाटील, रवींद्र खेवलकर, विजय चौधरी, कल्पेश शर्मा, दीपक वाणी, निलेश पाटील ,आबा भाऊ पाटील कैलास चौधरी,दिपक कोळी,गणेश तराळ,कैलास पाटील, अतुल पाटील, लीलाधर पाटील, विनोद काटे,सुनिल काटे,नंदकिशोर हिरोळे, चंद्रकांत बढे, नारायण चौधरी,उमेश राणे,सुधाकर जावळे, दिपक मराठे,राजेंद्र चौधरी व इतर मान्यवरांच्या हस्ते ओझरखेडा धरण येथे जलपुजन करण्यात आले.

Share post
Tags: #Jayant PatilEknathrao KhadseRohini tai Khadse
Previous Post

शिवशक्ती कॉलनीत अर्धवट कामे करून काढले पुर्ण बिल!

Next Post

लायन्स क्लबच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा केशवस्मृती प्रतिष्ठानने केला सत्कार

Next Post
लायन्स क्लबच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा केशवस्मृती प्रतिष्ठानने केला सत्कार

लायन्स क्लबच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा केशवस्मृती प्रतिष्ठानने केला सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group