जळगाव – संजय गांधी निराधार समिती जळगाव शहर ची बैठक दि 31 रोजी रेल्वे स्टेशन परिसरातील समितीच्या कार्यालयात समितीचे अध्यक्ष बाळासाहेब कंखरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सदर बैठकित मागील महिन्याचा बैठकीत आलेल्या प्रकरणां संबंधी चर्चा करण्यात आली.
त्यात श्रावण बाळ योजनेसाठी 119 प्रकरणे संजय गांधी योजनेसाठी 89 तर इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेचे 3 प्रकरण मंजूर करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब कंखरे यांनी दिली पालकमंत्री ना गुलाबरावजी पाटील यांच्या आशीर्वादाने जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे महानगर प्रमुख शरद तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व काम करत असल्याची भावना कंखरे यांनी व्यक्त करत सर्व शासकीय योजनांचा लाभ अधिकाधिक गरजू लोकांनी घ्यावा असे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे.
यावेळी तहसीलदार नामदेव पाटील संजय गांधी समिती सदस्य शोभा चौधरी संजय सांगळे मुकेश शिंदे हर्षल पाटील मिलिंद तायडे हेमराज चव्हाण अनिरुद्ध जाधव मनोज चौधरी आदी उपस्थित होते.