जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहरातील सिंधी कॉलनी भागात राहणाऱ्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील सिंधी कॉलनी परिसरात राहणारा रोहन इंदरकुमार मेहता (वय-२४) असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. रोहन आणि त्याचा भाऊ सागर यांचे बळीराम पेठेत साडीचे दुकान आहे. साडीचा व्ययसाय करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. नेहमीप्रमाणे आज घरी सकाळी ८ वाजता वर्तमान पत्र वाचत बसलेला होता. त्यावेळी आई सुनिता ह्या कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या.
दरम्यान, रोहनने घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. आई सुनिता घरात आल्यानंतर मुलाने गळफास घेतल्याचे उघडकीला आले. मुलाचा मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला. रोहनने घरात गळफास का घेतली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे.
नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली आहे. रोहनच्या पश्चात वडील, आई आणि एक १ मोठा भाऊ असा परिवार आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.