जळगाव, प्रतिनिधी । महापालिका क्षेत्रातील सुमारे ८ ते १० कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत पहिली गुणवत्ता यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली आहे यावर्षी अंतर्गत मूल्यांकन पद्धतीने निकाल जाहीर झाल्यामुळे मुलांच्या गुणवत्तेची टक्केवारी उंचावलेली आहे. दरम्यान, पहिल्या यादीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना तीन दिवसांत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
शहरातील उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांत कमी अधिक क्षमतेनुसार सुमारे १० ते १५ हजारांहूल अधिक कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांच्या जागा उपलब्ध आहेत. त्यात नूतन मराठा महाविद्यालयात शास्त्र, वाणिज्य व कला शाखांसाठी ४८० विद्यार्थी प्रवेशाची संख्या असून ७१० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केलेली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अर्जांची पडताळणी करण्यात येवून विद्यार्थ्यांची पहिल्या फेरीत निवड व गुणवत्ता यादी जाहिर करण्यात आली आहे. व त्यानुसार ४८० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. यात ४११ विद्यार्थ्यांना सरळ प्रवेश पद्धतीने प्रवेश देण्यात येणार आहे.
पहिल्या फेरीत प्रवेश
अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीसाठी शुक्रवारी गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर तात्काळ प्रवेश प्रक्रियेलाही सुरुवात झाली असून प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी ३०१ मुलांना सरळ प्रवेश प्रकियेव्दारे प्रवेश निश्चिती झाली आहे. यात कला शाखेत १९१ तर वाणिज्य शाखेसाठी २१० विद्यार्थ्यांना सरळ प्रवेश नश्चित केले आहे. प्रथम गुणवत्ता यादीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना ३० ऑगस्टपर्यंत त्यांचे प्रवेश निश्चित करावे लागणार आहे.
प्राधान्यक्रमनिहाय गुणवत्त विद्यार्थी – खुला गट (ओपन) ७९.८, ओबीसी- ७९.२, एस.सी. ६९.८, एस-टी- ६५.२, एन.टी ६७.४ टक्के अशी आहे. तर वाणिज्य शाखेत २१०, कला शाखेत १९१ व एचएससी व्होकेशनलसाठी ११० असे शाखानिहाय प्रवेश निश्चित झाले असून शास्त्र शाखसाठी गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येणार असल्याचे महाविद्यालय प्रशासनाने म्हटले आहे.