जळगाव, प्रतिनिधी । शहरातील हरिविठ्ठल नगर येथे राहणाऱ्या 27 वर्षीय विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना 27 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्थानकात पतीसह सासरच्या मंडळींनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंगावर पांढरे डाग असल्यासह माहेरुन पैसे आणण्याच्या कारणावरुन वारंवार होत असलेल्या पतीसह सासरच्यांच्या छळाला कंटाळून जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगर येथे दामिणी वैभव वैदकर वय २७ या विवाहितेने राहत्या गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार, २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मध्यरात्री रामानंदनगर पोलिसात पतीसह सासरच्या चार जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होवून शनिवारी सकाळी चारही जणांना अटक करण्यात आली आहे. पती वैभव रामचंद्र वैदकर, सासू ज्योतील रामचंद्र वैदकर, नणंद नयना रामचंद्र वैदकर व सासरे रामचंद्र काशिनाथ वैदकर अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.
दामिणी हिचा पतीसह तिच्या सासरच्यांनी वेळावेळी छळ केला. या छळामुळे तिनेच आत्महत्या केली असून सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका दामिणीच्या माहेरच्या नातेवाईकांनी घेतली होती. शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास दामिणीचा हिचा मृतदेह शवविच्छेदनानंतर तिच्या माहेरच्यांनी ताब्यात घेतला.
पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक राजेश शिंदे हे करीत आहेत. मयत दामिणी हिच्या पश्चात आई, वडील, अविवाहित भाऊ, बहिण तसेच दीड वर्षाचा मुलगा रियांश असा परिवार आहे. दामिणीचे पती वैभव हा जळगाव येथील विद्युत निरिक्षक कार्यालयात ज्युनिअर इंजिनिअर आहे. तर दामिणीचे सासरे रामचंद्र वैदकर हे महावितरणच्या परिमंडळ कार्यालयात मनुष्यबळ विभागात वरिष्ठ व्यवस्थापक आहेत.