जळगाव, प्रतिनिधी । शहरात आज युवाशक्ती व स्टुडन्ट चॅरिटी फाउंडेशन युवतीच्यावतीने मुख्यालय एनसीसीच्या मुख्यालय कार्यालयात जाऊन सैनिकांसोबत रक्षाबंधन साजरा करण्यात आला आहे.
युवाशक्ती व स्टुडन्ट चॅरिटी फाऊंडेशनच्या युवतींतर्फे शहरातील एन.सी.सी. च्या मुख्यालय येथे जाऊन सैनिकांसोबत रक्षाबंधन साजरा करण्यात आला. या वेळी देशाचे रक्षण करत असलेल्या सैनिकांना राखी बांधून, पेढा भरून रक्षाबंधन साजरा झाला. घरापासून लांब राहून सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना सलाम करत,आपलेपण वाटावा म्हणून सदर उपक्रम राबविण्यात आला. सदर सैनिक हे उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, बिहार, झारखंड, राजस्थान, उत्तराखंड, महाराष्ट्र, येथील आहे.
या वेळी एन.सी.सी.चे सुभेदार मेजर कोमल सिंग, सुभेदार अजित कुमार, सुभेदार सुनील पालवे, हवालदार विक्रम सिंग, अनिल कुमार, शैलेंद्र कुमार, मुकेश कुमार, युवाशक्ती फाऊंडेशन व स्टुडन्ट चॅरिटी फाऊंडेशनचे वैष्णवी खैरणार, विनिता पाटील, संस्कृती नेवे, वैष्णवी भांडारकर, नदाल मोदक, चाहत कटारिया, विराज कावडीया, अमित जगताप, सयाजी जाधव, उमेश देशमुख, यश भालशंकर आदी उपस्थित होते.