जळगाव, प्रतिनिधी । शहरातील आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव तर्फे सर्वजण एकत्र येऊन रक्षाबंधन मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा केला.
आज नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जळगाव यांच्यातर्फे अभाविप कार्यालया मध्ये सर्व कार्यकर्ते एकत्रित येऊन रक्षाबंधन सन साजरा केला. तसेच वैश्विक महामारी कारोनाचा काळामध्ये समाजासाठी रात्रीचा दिवस करत ज्यांनी खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष कार्य केले असे डॉक्टर्स व पोलीस कर्मचारी यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलिसांना व वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला.
कोरोना महामारीच्या काळात ज्या लोकांनी आपल्या वैयक्तिक आरोग्याची व परिवाराची काळजी न करता या समाजासाठी खरे देव दुत म्हणून कार्य केले.अश्या पोलीस व डॉक्टर, डॉक्टर इतर कर्मचारी तसेच वृक्ष संवर्धन म्हणून अभाविप तर्फे झाडांना राखी राखी बांधून नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली.
तसेच देशाच्या सीमेवर अहोरात्र सीमा रक्षणासाठी लढणाऱ्या खऱ्या सुपरहिरोंना जळगाव महानगरातून वेग वेगळ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी राख्या तसेच पत्र जमा करून सीमेवर पाठवण्यात आल्या. यावेळी महानगर मंत्री आदेश पाटील, आकाश पाटील ,रितेश महाजन, प्रज्वल पाटील,संकेत सोनवणे, हिमानी वाडीकर,भाग्यश्री कोळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.