Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

महाराष्ट्र नाभिक महामंडळ जळगाव जिल्हा कार्यक्रम संपन्न

by Divya Jalgaon Team
August 19, 2021
in जळगाव, सामाजिक
0
महाराष्ट्र नाभिक महामंडळ जळगाव जिल्हा कार्यक्रम संपन्न

जळगाव, प्रतिनिधी । माणसाच्या जीवनात त्याचे वागणे, बोलणे, राहणीमान याचे खुप महत्त्व आहे. त्यावरुन त्याचा प्रभाव पडत असतो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अनेक संकटे येतात, संकटाला न घाबरता, न डगमगता त्यावर मात कशी करता येईल याचा सकारात्मक विचार माणसाला दिशादर्शक ठरत असतो, असे विचार प्रसिध्द समुपदेक तथा संवादक गिरीष कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र नाभिक महामंडळ जळगाव जिल्हा यांच्या वतीने आयोजित *”सैदव सैनिक पुढेच जायचे”* शानबाग सभागृह या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश कार्याध्यक्ष दामोदर काका बिडवे होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र नाभिक महामंडळचे महिला प्रदेश अध्यक्ष भारतीताई सोनवणे, नाभिक समाज जिल्हाध्यक्ष रविद्र (बंटी) नेरपगारे,महिला जिल्हाध्यक्ष सौ. संगिताताई गवळी,कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोहर खोंडे, राज्य कार्यकारणी सदस्य सुधाकर सणांसे, जिल्हा उपाध्यक्ष चद्रकांत शिंदे, प्रशांत बाणाईत, कीन्ही संरपच सौ.निलमताई सोनवणे, रविद्र शिरसाठ (भडगाव), गणेश सोनवणे (चाळीसगाव), नाभिक कलादर्पण संघाचे मुकुंद धजेकर आदी उपस्थित होते.

प्रसिध्द समुपदेक गिरीष कुलकर्णी पुढे म्हणाले की, कोव्हीड-१९ च्या काळात अनेक बांधवाच्या नोकऱ्या गेल्या, अनेक व्यवसाय बंद पडले. या कारणानी ते रडत बसले नाही. त्याला काही तरी नविन पर्याय शोधला. आज त्याचे व्यवहार सुरळीत सुरु आहे. “आता मी काय करु” असा विचार करत जे शांत बसले ते आज ही विचारच करत आहे. माणसे त्याच्या कडे जे सामर्थ्य, वस्तु आहे. त्यावर ते समाधानी नाही. तर समोरच्या व्यक्ती कडे जे आहे. त्यामुळे ते दुःखी आहेत. हा संकुचित विचार माणसाला नैराष्य खाई ढकलत असतो. त्यामुळे समोरच्या व्यक्ती कडे काय आहे. याचा विचार करत बसण्यापेक्षा आपल्याकडे जे सामर्थ्य, वस्तु आहे त्यात समाधानी असायला हवे. हीच सकारात्मक वृत्ती माणसाला प्रगतीच्या दिशेने नेत असते. असे समपुदेश उपस्थित नाभिक समाज बांधवाना केले.
यावेळी नाभिक समाज जिल्हाप्रवक्ता तथा युवा उद्योजक कुणाल गालफाडे यांनी आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी संगत कीती महत्वाची व व्यवसाय वाढवताना (मांहोल ) वातावरण निर्मिती कशी करायाची यावर मार्गदर्शन केले.

जिल्ह्यातील नाभिक संरपच, उपसरपंच, सदस्यसह विशेष सत्कार
मागील काळात ग्रामपंचायत निवडणुका प्रशासना तर्फे घेण्यात आल्या. या ग्रामपंचायत निवडणुकीत जळगाव जिल्हातील नाभिक समाज बांधव, भगिणी विजयी झाले. यांचा जळगाव जिल्हा नाभिक समाजच्यावतीने विजयी ग्रा.प संरपच, उपसंरपच उपस्थित मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात सौ. निलम सचिन सोनवणे संरपच, कीन्ही ता. भुसावळ, सुनिता मधुकर सोनवणे उपसंरपच जिराळी ता. पारोळा, ज्ञानेश्वर खोंडे ग्रा.प.सदस्य वरखेडी ता. पाचोरा, कविता सनांसे रुईखेडा मुक्ताईनगर, सोनाली श्रीखंडे चांगदेव, लक्ष्मीबाई टोंगळे, भिमराव चित्ते, जगदीश निमकर, ज्ञानेश्वर नामदेव ठाकरे नाचणखेडे ता. पाचोरा, गोपाळराव आमोदे नायगाव ता. मुक्ताईनगर तर भाजपा ओबीसी मोर्चा महिला प्रदेश सरचिटणीस म्हणुन निवड झाल्याबद्दल सौ. भारतीताई सोनवणे अमळनेर, मुख्यध्यापक सघ अध्यक्षपदी संजय चैत्राम वाघ चाळीसगांव,कुणाल गालफाडे भुसावळ,साक्षी सापकर सावदा,राजेंद्र डापसे बोधवड,गणेश टोंगे मुक्ताईनगर, सचिन मालवेकर यावल,जयंत महाले,दिशा सैदाणे जळगांव, श्रीराम पर्वते* तसेच महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा झेंडा हाती घेणारे काही समाज बांधव किशोर वाघ,उदय पवार,सुयोग निकम यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

याच दरम्यान यावल तालुका अध्यक्ष शशिकांत वरुळकर,रावेर तालुका उपाध्यक्ष आबासाहेब च्योधरी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक जिल्हाध्यक्ष रविद्र (बंटी) नेरपगारे, सुत्र संचलन प्रा. राजेंद्र खोरखडेसर तर आभार जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत शिंदे यांनी मानले.
सदर कार्यक्रमास जिल्हातील भुसावल, यावल, रावेर, मुक्ताईनगर, भडगाव, पाचोरा,चाळीसगाव,जामनेर, बोदवड, येरोंडल सह अन्य तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिव कुमार सिरामे, संजय सोनवणे,योगेश (भैय्या) वाघ,अरुण श्रीखंडे, भीकन बोरसे,राजकुमार गवळी यांनी प्रयत्न केले.

Share post
Previous Post

आजचे राशीभविष्य, गुरूवार, १९ ऑगस्ट २०२१

Next Post

वावडदा येथे पावसामुळे केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Next Post
वावडदा येथे पावसामुळे केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

वावडदा येथे पावसामुळे केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group