Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या जयंतीनिमित्त महापौरांच्या हस्ते कविरत्न पुरस्काराचे वितरण

by Divya Jalgaon Team
August 13, 2021
in जळगाव, सामाजिक
0
कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या जयंतीनिमित्त महापौरांच्या हस्ते कविरत्न पुरस्काराचे वितरण

जळगाव, प्रतिनिधी । अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघप्रणीत बहिणाई ब्रिगेड या संघामार्फत आज शुक्रवार, दि. 13 ऑगस्ट 2021 रोजी नागपंचमीनिमित्त महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते समाजातील दहा कवींना कविरत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम शहरातील बहिणाबाई चौधरी उद्यानात दुपारी चारच्या सुमारास पार पडला.

बहिणाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा व माजी महापौर श्रीमती आशाताई कोल्हे, अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्री.प्रदीप ऊर्फ बंडू भोळे, प्रदेश उपाध्यक्षा सौ.हर्षा बोरोले, जिल्हाध्यक्षा सौ.सुनीता येवले, महानगराध्यक्षा श्रीमती साधना लोखंडे यांच्यासह कार्यकारिणीतील सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन व बहिणाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा व माजी महापौर श्रीमती आशाताई कोल्हे यांच्या हस्ते खानदेशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी श्रीमती आशाताई कोल्हे यांनी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी बहिणाबाई चौधरींच्या स्मृतींना उजाळा म्हणून काही कवींनी त्यांची गाणी गायिली. तसेच महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी आणि जळगाव यांच्यातील नाते उपस्थितांसमोर विशद केले. त्यानंतर श्री.तुषार वाघुळदे, श्री.के.के. भोळे, श्री.ए.के.नारखेडे, प्रा.डॉ.संध्या महाजन, सौ.सुनीता येवले, प्रा.डॉ.प्रकाश महाजन, सौ.मनीषा चौधरी, सौ.सविता भोळे, सौ.ज्योती राणे (पाटील) व सौ.शीतल शांताराम पाटील यांना महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते कविरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी नगरसेविका सौ.मीनाक्षी पाटील, श्रीमती रजनी महाजन, श्रीमती अंजली चौधरी आदी उपस्थित होत्या.

Share post
Previous Post

भाजपा कार्यालयात 15 ऑगस्ट रोजी ध्वजवंदन भारतमातेचे पूजन

Next Post

आजचे राशीभविष्य, शनिवार, १४ ऑगस्ट २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, शनिवार, १४ ऑगस्ट २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group