जळगाव – नाबार्ड व दि जळगाव पीपल्स कोऑप बँकेच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गट सदस्यांकरीता नेतृत्व विकास प्रशिक्षण हा एकदिवसीय कार्यक्रम बुधवार दिनांक 11 ऑगस्ट 2021 रोजी बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीचे औचित्य साधून घेण्यात आला. नाबार्डच्या सहाय्याने बँके नेहमीच बचत गटांसाठी विविध उपक्रम व प्रशिक्षणे राबवित असते. या कार्यक्रमात विशेषत: महिलांमध्ये असलेले व्यवस्थापन व नेतृत्व कौशल्यांना प्रोत्साहीत करणेसाठी प्रयत्न करण्यात आला.
सदर कार्यक्रमास होमा फार्मिंगचे तज्ञ श्री ब्रुस जॉन्सन, बिझनेस डेव्हलपमेंट कन्स्लटंट श्री समाधान पाटील हे प्रमुख अतिथी होते. तसेच नाबार्डचे सहा.महाव्यवस्थापक श्री श्रीकांत झांबरे, बँकेचे चेअरमन श्री अनिकेत पाटील व माजी चेअरमन व संचालक श्री.भालचंद्र पाटील हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचलन बँकेच्या बचत गट विभाग प्रमुख सौ.शुभश्री दप्तरी यांनी केले. सदर कार्यक्रमाचा शुभारंभ दीप प्रज्वलनाने करण्यात आला.
श्री भालचंद्र पाटील यांनी महिलांना सांगितले की, सर्व महिलांमध्ये नेतृत्व गुण असतातच त्याचा उपयोग त्या संसारात करुन घेत असतात. व्यवसाय करतांना ते गुण निरखून वापरले गेले पाहिजेत. श्री अनिकेत पाटील यांनी सांगितले की, बहुतेक महिला बचत गट सदस्य या छोटेमोठे व्यवसाय करतात. मेहनतही करतात परंतु व्यवसाय म्हटला की काहीतरी व्हिजन किंवा ध्येय ठेवून काम करावे, जेणेकरुन त्या ध्येयापर्यत पोहचण्यासाठी दिशाबद्ध प्रयत्न करता येतील. श्री श्रीकांत झांबरे त्यांनी बचत गटांसाठी उपलब्ध असलेल्या व्यवसायसंधी, सबसिडी याबद्दल माहिती दिली. महिलंानी व्यवसाय करतांना लोकांपर्यंत पोहचले पाहिजे मात्र ग्राहकाने एकदा तुमच्याकडून उत्पादन खरेदी केले की त्याने परत ते खरेदी करावे याकरीता उत्पादन गुणवत्ता यावर भर दिला पाहिजे, असे सांगितले.
पाश्चात्य देशांमध्ये भारतीय संस्कृती, अध्यात्म्य तसेच वैदीक मुल्ये यांची जोपासना केली जाते. त्याचे एक मुर्तीमंत उदाहरण म्हणजे श्री ब्रुस जॉन्सन आहेत. ते मूळचे ऑस्ट्रेलियाचे आहेत, ते व त्यांच्या पत्नी सौ.ऍनी गॉडफ्रे हे पारोळा येथील तपोवन मध्ये राहतात. स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त मा.वसंतराव परांजपे यांनी ऋर्ळींशषेश्रव झरींह चळीीळेप ढर्रिेींरप ची पारोळा येथे स्थापना केली. श्री ब्रुस जॉन्सन व सौ ऍनी गॉडफ्रे हे 1997 पासून तपोवनाचे काम बघतात. होमा ऑर्गनिक फार्मींग हे तेथील वैशिष्टय आहे. 24 तास अग्नीहोत्राचा होम प्रज्वलित असतो, त्यासोबत महामृत्युंजयाचा मंत्र अविरतपणे सुरु असतो. तसेच अग्नीहोत्रातील राखेचा वापर खत म्हणून केला जातो. त्यांनी होमा फार्मिंगचा प्रचार करण्यासाठी पन्नास हजारांहून जास्त कार्यक्रम राबवलेले आहेत. सौ ऍनी गॉडफ्रे या फॅशन डिझायनर आहेत. त्यांनी आतापर्यंत जवळपास आठ हजार महिलांना रोजगार मिळवून दिलेला आहे. त्या कपडे, गोधडया, पर्सेस, बॅग्ज महिलांकडून बनवून घेतात व तयार माल निर्यात करतात. त्यांनी वंचित महिलांना रोजगार व स्वावलंबनाचे धडे दिलेत. त्यांनी ही सर्व मदत निस्वार्थीपणे एकही रुपया न घेता केली. आपल्या मनोगतात श्री ब्रुस जॉन्सन यांनी वरील माहिती दिली. त्यांचे भाषांतरकार श्री संजय पाटील यांनी मराठी भाषेत उपस्थितांना सदर माहिती विषद केली. श्री समाधान पाटील हे व्यावसायिक असून त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात सांगितले की, महिला बचत गट सदस्य विविध व्यवसाय कौशल्याने करीत असतात. त्यांची उत्पादने अल्प प्रमाणात विक्री करीत असतात, मात्र सदर माल मोठ्या प्रमाणावर पुरवायचा असल्यास त्यांना शक्य होत नाही. याकरीता महिलांनी बचत गटांनी एकत्र येवून काम केल्यास कामाची व्याप्ती वाढवता येईल.
फोटोकॅप्शन: कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी डावीकडून सर्व मान्यवर- बँकेच्या बचत गट विभाग प्रमुख सौ.शुभश्री दप्तरी, श्री संजय पाटील, नाबार्डचे सहा.महाव्यवस्थापक श्री.श्रीकांत झांबरे, होमा फार्मींग तज्ञ श्री ब्रुस जॉन्सन, बँकेचे माजी चेअरमन व संचालक श्री.भालचंद्र पाटील, बिझनेस कन्स्लटंट श्री.समाधान पाटील व बँकेचे चेअरमन श्री.अनिकेत पाटील.