Friday, April 3, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

बहिणाबाई चौधरी यांचे स्मारकाची अवहेलना थांबवा

खासदार उन्मेशदादा पाटील यांची मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचेकडे मागणी

by Divya Jalgaon Team
August 10, 2021
in जळगाव, सामाजिक
0
बहिणाबाई चौधरी यांचे स्मारकाची अवहेलना थांबवा

जळगाव – राज्याच्या साहित्यिक क्षेत्रात अमूल्य योगदान आणि सर्वसामान्य जनतेला आपल्या अपूर्व साहित्य निर्मितीतून जीवन जगण्याचे सार सांगणाऱ्या कवियीत्री, खान्देश कन्या तथा निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांचे स्मारक 2012 रोजी सुमारे तीन एकर जागेत आसोदा या त्यांच्या जन्मगावी मंजूर करण्यात आले होते.

मात्र गेल्या नऊ ते दहा वर्षापासून या स्मारकाच्या कामाला आजपावेतो आवश्यक गती मिळालेली नाही. यामुळे खान्देशासह राज्यातील साहित्यिकांमध्ये नाराजी वाढली असून खानदेशात बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाबाबत होत असलेली उपेक्षा मनाला वेदना देणारी आहे. याबाबत आपण आग्रही भूमिका घेत स्मारकाची उपेक्षा थांबवावी अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचेकडे पत्राद्वारे केली आहे.

खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांनी निरक्षर असून देखील आपल्या अमोघ वाणीतून जीवन जगण्यासाठी सहाय्यक ठरणार्‍या अमूल्य साहित्याची निर्मिती केली आहे. निसर्गकन्या कवियीत्री बहिणाबाई चौधरी यांचे स्मारक तात्काळ पर्यटन स्थळ विकास कार्यक्रमांतर्गत अथवा ग्राम विकास निधी या योजनेतून लवकरात लवकर होणेबाबत कार्यवाही व्हावी.

सद्यस्थितीत कवियित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाबाबत झाडेझुडपे गवत वाढल्याने स्मारकाबाबत होत असलेल्या या उदासिनतेमुळे पंचक्रोशीत व्यवस्थेविरुद्ध प्रचंड चीड निर्माण झाली आहे. सुमारे तीन एकर जागेत होणारे भव्य स्मारकासाठी पाच कोटी रुपये जिल्हा विकास नियोजन निधीतून खर्च करण्यासंदर्भात तरतूद करण्यात आली होती मात्र नंतर या कामाबाबत अक्षम्य दिरंगाई झाली राज्यातील साहित्यिकांमध्ये देखील याबाबत वाढती नाराजी पाहता तातडीने आपण बहिणाबाई चौधरी स्मारकाच्या उचित गौरव साठी कार्यवाही करावी.

आपण राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून आग्रही भूमिका घ्यावी अशी या माध्यमातून विनंती करीत आहे. येत्या 24 ऑगस्ट रोजी कवियित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंती असून यापूर्वी आपण याबाबत कार्यवाही कराल. अशी अपेक्षा खासदार उन्मेशदादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.राज्याचे पर्यटनमंत्री ना.आदित्य ठाकरे, राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ, जिल्हयाचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, राज्याचे मुख्य सचिव,म.जिल्हाधिकारी जळगाव यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

Share post
Tags: #Aditya thakre news#Udhaw thakre news#Unmesh Patil news
Previous Post

५१ वृक्ष लावण्याचा संकल्प करून साजरी झाली नामदेव महाराज पुण्यतिथी

Next Post

आजचे राशीभविष्य, बुधवार, ११ ऑगस्ट २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, बुधवार, ३ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, बुधवार, ११ ऑगस्ट २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group