जळगाव – श्री.क्षत्रिय् अहिर शिंपी समाज संस्था संचलित शिव कॉलनी अशा बाबा परिसरात तर्फे दि.८ ऑगस्ट रोजी गणपती मंदिर शिव कॉलनी येथे संत नामदेव महाराजांच्या ६७१व्या संजीवन समाधी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त एक उत्कृष्ट व अनोखा कार्यक्रम घेण्यात आला.
वृक्षा रोपणाचा संकल्प करून ५१ वृक्ष लावण्याचा संकल्प करून आलेल्या मान्यवरांना पुष्पगुच्छ न देता वृक्ष देऊन त्यांचे स्वागत करून एक आगळावेगळा संत नामदेव महाराज पुण्यतिथी कार्यक्रम साजरा झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव शहर शिंपी समाज अध्यक्ष राजेन्द्रकुमार सोनवणे होते. यावेळी दीपपूजन व प्रतिमापूजन रामानंद नगरचे पी.आय.श्री. बिरारी माजी महापौर सीमाताई भोळे, नगरसेविका दीपमाला काळे यांनी केले.
यावेळी उपाध्यक्ष विवेक जगताप,सचिव चंद्रकांत जगताप. कोषाध्यक्ष संजय जगताप, मुकूंद मेटकर, सुरेश कापुरे, मनोज भांडारकर, दिलीप सोनवणे, प्रशांत कापुरे, गणेश सोनवणे, शैलेंद्र मांडगे, निलेश कापुरे, दिलीप भामरे, कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष संजय निकुंभ, निमंत्रित सदस्य , सुधाकर कापुरे, योगेश सोनवणे, रतिलाल शिंपी, चंद्रकांत देवरे, देवानंद सोनवणे सुभाष भांडारकर निंबा सोनवणे पवन शिंपी, गांगुर्डे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी युवक अध्यक्ष मनोज भांडारकर यांनी केले.