Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

कोरोना काळातही पत्रकारांची महत्वाची भूमिका – मंत्री ना. यशोमती ठाकूर

by Divya Jalgaon Team
August 7, 2021
in जळगाव, सामाजिक
0
कोरोना काळातही पत्रकारांची महत्वाची भूमिका – मंत्री ना. यशोमती ठाकूर

रावेर, (प्रतिनिधी) – पत्रकार हा देशाची ताकत असून लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ आहे. लोकशाही मध्ये महत्वपूर्ण कार्य पत्रकारांचे असते. कोरोना काळातही पत्रकारांनी मोलाची भूमिका बजावली आहे. आपल्या सभोवताली घडणाऱ्या चांगल्या- वाईट गोष्टींची मांडणी ही पत्रकार योग्य पद्धतीने मांडत असतात. आणि मांडायला ही पाहिजे असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री ना. यशोमती ठाकूर यांनी केले.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जनता शिक्षण मंडळ सभागृह खिरोदा ता.रावेर येथे दिनांक ७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता आयोजित पत्रकारांना मोफत हेल्मेट वाटप व पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी मंत्री ना. यशोमती ठाकूर बोलत होत्या.

पत्रकार जीवन गौरव व मुकनायक पुरस्काराने सन्मानित
पत्रकार दिलीप वैद्य रावेर व सुरेश जगन्नाथ पाटील यांना जीवन गौरव तर मूकनायक पुरस्कार पत्रकार देवलाल पाटील व दत्तात्रय पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध व्यक्तींना देखील यावेळी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

पत्रकारांना हेल्मेट वाटप
यावेळी उपस्थित २२५ पत्रकारांना हेल्मेट वाटप करण्यात आले प्रतिनिधीक स्वरूपात मंत्री ना.यशोमती ठाकूर व आमदार शिरीषदादा चौधरी व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हेल्मेट वाटप करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमास आ.शिरीष चौधरी, आमदार चंद्रकांत पाटील, विनायकराव देशमुख, अभय छाडेज, डॉक्टर उल्हास पाटील जळगाव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, युवा नेते धनंजय चौधरी, जि प सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे, जि प सदस्य सुरेखा पाटील, देवयानी महाजन नगरपालिका उपनगराध्यक्ष यावल,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे, खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रदीप गायके, विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, भूषण महाजन, जिल्हा कार्यध्यक्ष शरद कुलकर्णी,ग्रामीण जिल्हाकार्यध्यक्ष दीपक सपकाळे, महिला जिल्हाध्यक्ष नजनीन शेख, महानगध्यक्ष कमलेश देवरे,जिल्हा सहसंघटक चेतन निंबोळकर,माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष हेमंत विसपुते, धरणगाव तालुकाध्यक्ष गोपाल सोनवणे, पाचोरा तालुकाध्यक्ष शांताराम चौधरी, चाळीसगाव तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी अबरार मिर्झा, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विनोद कोळी यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी केले तर सुत्रसंचालन प्रा.दिलीप सोनवणे, शरद कुलकर्णी, कमलेश देवरे यांनी केले. आभार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ तालुकाध्यक्ष विलास ताठे मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विलास ताठे ,उपाध्यक्ष संतोष नवले ,कार्याध्यक्ष योगेश सैतवाल, सल्लागार सद्दाम पिंजारी, महेंद्र पाटील व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share post
Tags: #maharastra Rajy marathi patrakar sangh
Previous Post

तेली समाज नाशिक विभाग युवक कार्याध्यक्षपदी प्रशांत सुरळकर यांची निवड 

Next Post

आजचे राशीभविष्य, रविवार, ८ ऑगस्ट २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, रविवार, ८ ऑगस्ट २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group