जळगाव – महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा जळगाव जिल्हापुर्वचे अध्यक्ष श्री प्रशांत सुरेश सुरळकर यांची नाशिक विभाग तेली समाजाच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा या संस्थेच्या नावात बदल झाला असून प्रदेश तेली महासंघ महाराष्ट्र राज्य असे नामकरण करण्यात आले आहे.
प्रदेश तेली महासंघ महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष विजय भाऊ वसंतलाल चौधरी यांनी प्रशांत सुरेश सुरळकर यांना प्रदेश तेली युवक महासंघ नाशिक विभागाच्या कार्याध्यक्ष या पदावर नियुक्तीपत्र देऊन अभिनंदन केले. तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री जयदत्त क्षीरसागर साहेब माजी मंत्री यांचे आदेशानुसार तसेच माजी खासदार सुरेश वाघमारे ,श्री विक्रांत चांदवडकर, प्रदेश महासचिव ज्ञानेश्वर दुर्गुळे, विजय काळे ,महिलाअध्यक्ष सौ संध्याताई सव्वालाखे, प्रदेश कार्याध्यक्ष जयश्रीताई अहिरराव, प्रदेश युवक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष विजय भाऊ चौधरी, युवक महासंघाचे महासचिव श्री साई शेलार, युवक महासंघाचे कार्याध्यक्ष श्री श्यामकांत इशी, सौ प्रतिभा ताई चौधरी धुळे ,यांच्या सर्वसंमतीने प्रशांत सुरेश सुरळकर यांची दि.1 आगस्ट रोजी नंदुरबार येथे नियुक्ती करण्यात आली आहे .
श्री प्रशांत सुरेश सुरळकर यांच्या निवडीबद्दल प्रदेशाध्यक्ष श्री विजय भाऊ चौधरी ,श्री श्यामकांत इशी, प्रदेश तेली सेवा महासंघाचे अध्यक्ष श्री भागवतराव माणिक चौधरी, जळगाव जिल्हा कायदाविषयक महासंघाचे अध्यक्ष श्री ऍड वसंतराव भोलाने, प्रियाताई महिंद्रे ,श्री सुखदेव वंजारी ,श्री कृष्णरावजी हिंगणकर साहेब, प्रशांत जामखेड, नाशिक विभागाचे युवा महासंघाचे अध्यक्ष सदानंद चौधरी, जळगाव जिल्हा तेली समाज महासंघाचे अध्यक्ष श्री के. डी. चौधरी , जळगाव जिल्हा महिला महासंघाचे अध्यक्षा निर्मलाताई रामचंद्र चौधरी ,आदी मान्यवरांनी श्री प्रशांत सुरळकर यांचे अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
नियुक्तीपत्र देताना प्रदेश महासंघाचे सचिव श्री अशोक भाऊ चौधरी, संदीप चौधरी, ,महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्री बी. एम. चौधरी , ऍड वसंतराव भोलाने ,रामचंद्र चौधरी, के. डी. चौधरी निर्मलाताई चौधरी देवकान्त के. चौधरी आदी उपस्थित होते.
यावेळी प्रशांत सुरळकर यांनी समाजासाठी , वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली भरीव कार्य करण्याचे आश्वासन दिले . प्रदेशाध्यक्ष विजय भाऊ चौधरी ,युवा महासंघाचे कार्याध्यक्ष श्यामकान्त इशी, सन्माननीय जयदत्तजी क्षीरसागर साहेब आणि सर्व वरिष्ठ नेत्यान्चे आभार मानले.