पाचोरा – राष्ट्रसंत शिरोमणी श्री नामदेव महाराज समाज मंदिरात पाचोरा शहर शिंपी समाज सेवा मंडळ पाचोरा चे अध्यक्ष सुर्यकांत देविदास निकम यांच्या हस्ते संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर संत शिरोमणी नामदेव महाराज यांची आरती व पसायदान चे वाचन जेष्ठ समाजसेवक भिकाशेठ शिंपी व जिल्हा कार्याध्यक्ष विजय खैरनार यांनी केले.
त्यानंतर तालुका संघटक राजेंद्र मांडगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. समाजातील दिवंगत झालेल्या बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. भिकाशेठ शिंपी , विजयजी खैरनार, सुर्यकांत निकम, धनराज सोनवणे, महिला मंडळ अध्यक्षा मंजुषा मांडगे, अ.भा.प्रतिनिधी नयना निकम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात समाज मंदिरासाठी मान्यवर व देणगीदार डॉ.मनोहर बाविस्कर, .भिकाशेठ शिंपी, विजयजी खैरनार, माजी लष्करी जवान श्रीराम सोनवणे, धनराज चव्हाण, राजेंद्र बाबुलाल कापुरे, मंजुषा मांडगे, यांनी भरभरुन देणगी घोषित केली. सर्व देणगीदार यांचे अध्यक्षांनी आभार मानले.
संजीवन समाधी सोहळ्यास महिला प्रतिनिधी डॉ.मिनाताई बाविस्कर, भाग्यश्री शैलेश शिंपी, विमलबाई भिकाशेठ शिंपी, दिपाली संजय,मिनाबाई प्रकाश जगताप, मोहिणी विनोद जगताप, मनिषा कापुरे, दिपक कापुरे, कापुरेताई, पाचोरा तालुका अध्यक्ष राजेंद्र कापुरे, सचिव.मुकेश जगताप, विनोद जगताप, प्रकाश जगताप, जितेंद्र सोनवणे, प्रकाश वामनशेठ शिंपी, संजय वाल्मिक शिंपी, विजय कापुरे, तालुका युवक अध्यक्ष शैलेश चव्हाण, अॅड.निलेश सोनवणे, राजेंद्र दत्तात्रय सोनवणे, भुषण संजय शिंपी, पाचोरा शहरातील प्रख्यात आयआयटीयन स्थापत्य अभियंता विजयन सुर्यकांत यांची प्रमुख उपस्थिती होती.
नुतन अध्यक्ष सुर्यकांत निकम यांनी त्यांची नविन कार्यकारिणी घोषित केली.
तर कार्यक्रमाच्या शेवटी सचिव कैलास निकम यांनी सर्व देणगीदार यांचे आभार मानले व सर्व उपस्थितांचे आभार मानले व अध्यक्ष यांच्या परवानगीने कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.