जळगाव, प्रतिनिधी । संत शिरोमणी नामदेव महाराज पुण्यतिथीनिमित्त आज शुक्रवार, दि. 6 ऑगस्ट 2021 रोजी शहरातील शिवाजीनगर परिसरातील श्री क्षत्रिय अहीर शिंपी समाज हितवर्धक संस्था, जळगाव संचलित शाखेतर्फे क्षत्रिय समाज मराठा सभागृहात संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यात आला.
सुरूवातीला प्रमुख अतिथी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमापूजन झाले. नगरसेविका सौ.गायत्री शिंदे, श्री क्षत्रिय अहीर शिंपी समाज हितवर्धक संस्थेचे जिल्हाध्यक्ष श्री.दत्तात्रय कापुरे, उपाध्यक्ष श्री.राजेंद्र सोनवणे, श्री.गिरीश जगताप, सचिव श्री.चंद्रकांत जगताप, अखिल भारतीय महिला उपाध्यक्षा कुसुमताई बिरारी यांच्यासह शिंपी समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या उपस्थितीत शिवाजीनगर शाखेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी श्री.गणेश सोनवणे, उपाध्यक्षपदी श्री.प्रेमराज निकुंभ, कोशाध्यक्षपदी प्रकाश नेरपगार, सचिवपदी संजय गवांदे यांच्यासह सदस्यांचा समावेश आहे. यावेळी श्री क्षत्रिय अहीर शिंपी समाज हितवर्धक संस्थेच्या नूतन शाखेच्या कार्यकारिणीने महापालिकेच्या मालकीच्या शहरातील खुल्या भूखंडांतून एखादा भूखंड शिवाजीनगरातील शिंपी समाजाला सभागृहासाठी द्यावा, अशी मागणी केली. त्यावर महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन म्हणाल्या, की आपणच शहरातील महापालिकेच्या मालकीचा एखादा खुला भूखंड शोधावा आणि महापालिकेकडे तसा प्रस्ताव पाठवावा. मी या कामात जरूर लक्ष घालेन. याप्रसंगी शिंपी समाजाच्या प्रत्येक कार्यात सक्रिय सहभाग नोंदविणार्या विनोज गुजर यांचा महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री.चंद्रकांत जगताप यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.