म्हसावद – साहित्याचे वाटप कोकण पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गावांमध्ये पावसाचे पाणी शिरून घर दुकान अन्न वस्त्र सह त्यांच्या मदतीसाठी झटणाऱ्या हातांची गरज आज टायगर ग्रुप मार्फत पूर्ण करण्यात आली टायगर ग्रुप संस्थापक अध्यक्ष पैलवान जालिंदर भाऊ जाधव टायगर ग्रुप अध्यक्ष पैलवान डॉक्टर तानाजी भाऊ जाधव उत्तर महाराष्ट्राचा बुलंद आवाज पैलवान सागर भाऊ कांबळे व खान्देश आध्यक्ष ऋषिकेश बाबा भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर ग्रुप खानदेश विभागांमधून टायगर ग्रुप च्या वतीने मदत पोचविण्यात आली जळगाव जिल्ह्यातील टायगर ग्रुप च म्हसावद च्या वतीने व ग्रामस्थांच्या सहकार्याने कोकण चिपळूण कोल्हापूर या तिन्ही पूरग्रस्त भागांमध्ये मदत म्हणून किराणा किट बनवून टायगर ग्रुप म्हसावद मार्फत पोहोचविण्यात आली मदत पोहचवीत असताना संपूर्ण टायगर ग्रुप म्हसावद व ग्रामस्थ उपस्थित होते