जळगाव – शिवसेनेच्या युवा सेनेचे राष्ट्रीय सचिव मा.श्री.वरुणजी सरदेसाई आपल्या चौथ्या टप्प्यातील उत्तर महाराष्ट्रातील ‘युवा संवाद’ व पदाधिकारी बैठक दौर्याच्या निमित्ताने आज गुरुवार, दि. 5 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी साडेसहाला जळगावात दाखल झाले. त्यानंतर जैन हिल्स व गांधी रिसर्च फाऊंडेशनला भेट देण्यासाठी गेले असता तेथे महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी त्यांचे तमाम जळगावकरांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर साडेअकराच्या सुमारास ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या मेहरुण तलाव परिसरात त्यांचे आगमन झाले असता त्यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घोषणा देत जल्लोष केला.
युवा सेनेचे विस्तारक मा.श्री.कुणालजी दराडे, युवा सेनेचे सहसचिव मा.श्री.रूपेशजी कदम, युवा सेनेचे कोअर कमिटी सदस्य मा.श्री. योगेशजी निमसे, युवा सेनेचे विस्तारक मा.श्री.अजिंक्यजी चुंभळे यांच्यासह शिवसेनेचे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख मा.श्री.संजयजी सावंत, महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन, जिल्हा परिषदेचे सदस्य श्री.प्रतापराव पाटील, उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख (जळगाव शहर-ग्रामीण, अमळनेर) श्री.विष्णू भंगाळे, डॉ. हर्षल माने, माजी महापौर श्री.नितीन लढ्ढा, बुलडाणा संपर्कप्रमुख श्री.किशोर भोसले, महापालिकेतील विरोधी पक्षनेते श्री.सुनिल महाजन, महानगरप्रमुख श्री.शरद तायडे, आर्कि.श्री.शिरीष बर्वे, आर्कि.श्री.अमेय बर्वे, मराठी प्रतिष्ठानचे श्री.विजयकुमार वाणी, उद्योजक श्री.आऩंदराव मराठे, नगरसेवक श्री.नितीन बर्डे, श्री.प्रशांत नाईक, श्री.गणेश सोनवणे, नगरसेविका सौ.पार्वताबाई भिल, माजी नगरसेवक श्री.अमर जैन, शिवसैनिक श्री.विराज कावडिया, श्री.अमित जगताप, श्री.संजय कापसे, शिवसेना महिला आघाडीच्या शहरप्रमुख सौ.शोभा चौधरी, उपशहरप्रमुख सौ.ज्योती शिवदे, शिवसैनिक सौ.सरिता माळी-कोल्हे, युवती सेनेच्या जळगाव सरचिटणीस जयश्री पाटील, विशाल वाणी, पीयूष गांधी, मिलिंद शेटे, अमोल मोरे, तेजस दुसाने यांच्यासह शिवसैनिक व युवा सेनेचे कार्यकर्ते याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला मा.श्री.वरुणजी सरदेसाई यांचे स्वागत माजी महापौर श्री.नितीन लढ्ढा यांनी पुष्पगुच्छ, श्रीफळ व वह्यांचा संच देऊन केले. त्यानंतर जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख मा.श्री.संजयजी सावंत यांचे स्वागत महापालिकेतील विरोधी पक्षनेते श्री.सुनील महाजन, युवा सेनेचे विस्तारक मा.श्री.कुणालजी दराडे यांचे उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील, युवा सेनेचे सहसचिव मा.श्री.रूपेशजी कदम यांचे शिवसेना जिल्हाप्रमुख (जळगाव शहर-ग्रामीण, अमळनेर) श्री.विष्णू भंगाळे, युवा सेना कोअर कमिटी सदस्य मा.श्री.योगेशजी निमसे यांचे शिवसेना महानगरप्रमुख श्री.शरद तायडे, तर युवा सेनेचे विस्तारक मा.श्री.अजिंक्यजी चुंभळे यांचे स्वागत शिवसैनिक श्री.विराज कावडिया यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. तद्नंतर मा.श्री.वरुणजी सरदेसाई यांनी कार्यक्रमस्थळावरूनच मेहरुण तलाव परिसराची यथायोग्य पाहणी केली व या तलाव परिसरानजीकच्या शेत शिवारात पिकणारी गोड बोरे यांचीही माहिती महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्याकडून जाणून घेतली.
वरुण सरदेसाईंची ‘वहीतुला’
कार्यक्रमस्थळी मा.श्री.वरुणजी सरदेसाई यांची महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या वतीने ‘आनंद नोटबुक’ या कंपनीच्या वह्यांच्या माध्यमातून ‘वहीतुला’ करण्यात आली. त्यानंतर महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी कोकणातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना विशेष ऊर्जा संदेशासह पाच हजार ‘आनंद नोटबुक’ वह्यांची मदत म्हणून त्यात समावेश केला. त्यानंतर या सर्व वह्या कोकणाकडे पाठविण्यात आल्या. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाच्या आयोजनाने मा.श्री.सरदेसाई अतिशय भारावून गेले.
मेहरुण तलावाचा विकास आराखडा सादर
मेहरुण तलाव परिसराच्या पाहणीवेळीच महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्यासमवेत माजी महापौर श्री.नितीन लढ्ढा व आर्कि.श्री.शिरीष बर्वे यांनी मेहरुण तलावाचा विकास आराखड्याचे सादरीकरण केले. सदर मेहरुण तलावातील 63 हजार ब्रास गाळ लोकसहभागातून काढण्याचे कार्य स्वतः श्री.लढ्ढा व त्यांच्या सहकार्यांनी उभे राहून पूर्ण केले असल्याची माहिती मा.श्री.वरुणजी सरदेसाई यांना यावेळी दिली. तसेच आराखड्याचे विस्तृत सादरीकरण समजून घेतल्यानंतर मा.श्री.सरदेसाई यांनी मेहरूण तलावात श्रीफळ अर्पण करून संकल्प केला व महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन व संंबंधितांना एकदा मुंबईला येऊन राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचारमंत्री मा.ना.श्री.आदित्यजी ठाकरे साहेबांकडे त्यांच्या समक्ष सविस्तर हे सादरीकरण द्या, निश्चितपणे यासंदर्भात लागणार्या मदतीसाठी सकारात्मक विचार होईल, यासाठी आठवडाभरात बैठकीचे नियोजन करू, असे सांगत दहा कोटी रुपये निधी या प्रकल्पाला सुरूवात करण्यासाठी देण्यासंदर्भातही त्यांच्याशी चर्चा करू, अशी ग्वाही देत आश्वस्त केले.
मान्यवरांनी घेतला नारळपाण्याचा आस्वाद
दरम्यान, कार्यक्रमस्थळी मा.श्री.वरुणजी सरदेसाई यांच्यासह सर्व मान्यवरांनी मेहरूण तलावाच्या निसर्गरम्य परिसरात एकत्रितपणे नारळपाण्याचा आस्वाद घेतला. तसेच उपस्थित नगरसेवक, शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकार्यांसमवेत फोटोसेशनही केले. या कार्यक्रमानंतर मा.श्री. सरदेसाई यांच्यासह सर्व मान्यवरांनी ‘युवा संवाद’, पदाधिकारी बैठक या कार्यक्रमासाठी महाबळ रोडवरील छत्रपती संभाजीराजे नाट्यसंकुलाकडे प्रस्थान केले. श्री.गिरीश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.