जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती ना. डॉ. नीलमताई गोऱ्हे या शुक्रवार, दि. 6 ऑगस्ट, 2021 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
शुक्रवार, दि. 6 ऑगस्ट रोजी सकाळी 8.00 वाजता धुळे विश्रामगृह येथून जळगावकडे प्रयाण. सकाळी 11.00 वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 11.15 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जळगावकडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन. सकाळी 11.35 ते 12.15 वाजेपर्यंत शासकीय अधिकारी यांच्यासमवेत कोरोनामुक्त गावांचा आढावा. दुपारी 12.15 ते 1.00 वाजेपर्यंत कोरोना काळात सामान्य नागरीक, कामगार, शेतकरी, मजूर यांना मदत देण्यासाठी शासनाच्यावतीने देण्यात आलेल्या योजनांचा आढावा. (कृषीविभाग, कामगार विभाग, परिवहन विभाग, रोहयो व आदिवासी विकास विभाग, महिला व बाल विकास विभाग) दुपारी 1.00 वाजता शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव.
दुपारी 2.30 वाजता जळगाव शिवसेना पक्ष कार्यालयाकडे प्रयाण. दुपारी 2.45 ते 4.00 वाजेपर्यंत जळगाव शिवसेना पक्ष कार्यालय येथे आगमन, कार्यकर्त्यासमवेत चर्चा व शिवसंपर्क मोहिमेचा आढावा. कार्यकर्त्यांशी जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत चर्चा. दुपारी 4.00 जळगाव शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. दुपारी 4.15 ते 6.30 वाजता जळगाव शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.