जळगाव, प्रतिनिधी । शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे संघर्ष दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय संस्था जळगावतर्फे वृक्षारोपण करण्यात आले.
संघर्ष दिव्यांग कल्याण बहुउद्देशिय संस्था जळगाव तर्फे 275 वृक्षारोपण करण्याचा संकल्प 3 ऑगस्ट 2021 रोजी 5 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय जळगांव येथे आयोजित करण्यात आला. डॉ. जयप्रकाश रामानंद (अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय जळगांव) यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. डॉ. मारोती पोटे (उपअधिष्ठाता), अशोक लाडवंजारी (माजी नगरसेवक), माजी नगरसेवक सुनील भैया माळी, शेखर वैद्य (लोकमित्र फाउंडेशन अध्यक्ष), गणेश पाटील (अध्यक्ष संघर्ष दिव्यांग संस्था), विशाल देशमुख, गौरव डांगे, दिपाली कासार (सामाजिक कार्यकर्त्या), गोपाल कासार, आनंद शिरापुरे, संजय जाधव, जितू पाटील, किशोर नेवे, विश्वजित चौधरी, प्रवीण भोई, राजेंद्र वाणी, गजानन हटकर, संतराम एकाशिंगे, आशा पाटील, संगीता प्रजापती, मनीषा दळवी आदींनी परिश्रम घेतले.