जळगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील वावडदासह परिसरामधील अनेक गावांमध्ये सट्टा पत्ता रेती व्यवसायाला ऊत आला आहे. त्यामुळे या भागातील अवैध धंद्यांना खतपाणी मिळतेय. याकडे मात्र पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.
या परिसरातील वावडदासह वडली. म्हसावद, पाथरी, वराड, जळके, विटनेर, शिरसोली भागात गेल्या ३ वर्षांपासून सट्टा पूर्णपणे बंद होता. परंतु, आता हा अवैध धंदा मोठ्या जोमाने सुरू आहे. या गैरप्रकाराच्या आहरी गेलेल्या गरीबांचे मोठे नुकसान होतेय. आशेपोटी हातमजुरी करणारे लोक या सट्ट्यकडे वळत आहेत. दररोज २०० रुपये रोजाने काम करणारे गोरगरीब व त्याच्या संसाराचे वाटोळे होत आहे. या प्रकारांमुळे गुन्हेगारी जास्त वाढतेय. या भागातील सट्टा पत्ता. अवैध रेती वाहतुक त्वरित बंद करण्याची मागणी होत आहे.
म्हसावद गिरणा नदी.कुळकुळ नाला तुन अवैध रेती उपसा चालु आहे या परिसरितील तलाठी व तहसिलदार ना अनेक वेळा निवेदन देऊन ही कारवाई होत नाही अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुज्ञ नागरिकांनी दिला.