जळगाव – अन्ना भाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंती निमित्त एम.आए.एम पक्ष, जळगाव तर्फे त्यांच्या प्रतिमेवर पुष्पहार अर्पण करीत अन्ना भाऊ साठे यांना श्रद्धांजली देण्यात आली.
एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक असून साठे यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे असल्याचे उल्लेख या ठिकाणी करण्यात आले.
यावेळी एम.आए.एम चे जळगाव लोक सभा अध्यक्ष ऍड इमरान शे. हुसैन, नार्थ महाराष्ट्र स्टूडेंट विंगचे अध्यक्ष सानिर सैय्यद ,म.न.पा नगरसेवक हाजी यूसुफ शेख, अकरम देशमुख, अविनाश गायकवाड़, इमरान खान, वरिष्ठ पत्रकार अंजुम रिज़वी तसेच इतर एम.आए.एमचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.