पाचोरा – पाचोरा तालुका येथील मोंढाळा जि.प. मराठी शाळा येथे जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे यांच्या प्रयत्नातून शाळा तिथे वृक्षारोपण हा कार्यक्रम घेण्यात आला.
कोरोना महामारी मुळे मनुष्य जीवनाची फार मोठी हानी झाली व महामारी मुळे आपल्याला निसर्गा पासून फुकट मिळणाऱ्या ऑक्सिजनचे महत्व समजले. याकार्यक्रमा आंतर्गत प्रत्येक शिक्षकांच्या हस्ते पाच रोपटे याप्रमाणे शाळेत वृक्षारोपण करण्यात आले.
घरोघरी मोबाईल आल्यामुळे मुलांचे मैदानी खेळ कमी झाले त्याचा परिणाम यांचा शारीरिक वाढीवर होतांना दिसत आहे. मुलांना आभ्यासा बरोबर मैदानी खेळांची गोडी लागावी या साठी क्रिडांगण विकास निधीतून कबड्डी , खो खो, व्हॉलीबॉल या क्रिडांगणाचे भूमिपूजन करण्यात आले या कार्यक्रमास जि.प.सदस्य मधुकर काटे, जि. प. सदस्य डी एम पाटील ,पं. समिती सदस्य सुभाष पाटील, प्रदिप नाना पाटील तसेच कार्यक्रमास म. सरपंच व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, धनराज पाटील , केंद्रप्रमुख चिंचोले ई. मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक मनोहर सोनवणे व सर्व शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले.