चाळीसगाव – मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्ताने चाळीसगाव येथील महिला आघाडीचे शिवसेना तालुका प्रमुख सविता ताई कुमावत यांच्या वतीने प्रभाग क्र 1 मध्ये साने गुरुजी शाळा डेराबर्डी येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराज व मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा पूजन महानंदा ताई पाटील, जिल्हा प्रमुख महिला आघाडी, उप जिल्हा प्रमुख रोहिदास पाटील, जिल्हा समन्वयक महेंद्र बापू पाटील, तालुका प्रमुख रमेश आबा चव्हाण, महिला आघाडी तालुका प्रमुख सौ.सविता ताई कुमावत ,तालुका संघटक सुनील गायकवाड,माजी नगरसेवक संजय ठाकरे, उपशहर प्रमुख शैलेश सातपुते, आबासाहेब गरुड यांच्या हस्ते करण्यात आले. तर रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हाप्रमुख महानंदा ताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख डॉ हर्षल माने यांनी चाळीसगाव येथे भेट देऊन रक्तदान शिबिर मध्ये सहभाग घेऊन रक्तदान केले व तालुका संघटक सुनील गायकवाड, शिवसेना शाखाप्रमुख रामेश्वर चौधरी, युवा सेना विभाग प्रमुख चेतन कुमावत, कैलास सोमवंशी अशा अनेक जणांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदान करणाऱ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी वशिम चेअरमन अल्पसंख्याक शहर प्रमुख, प्रवक्ते दिलीप घोरपडे, अनिल राठोड उपतालुका प्रमुख, पूनम ताई पाटील, सुवर्णा ताई राजपूत, प्रतिभाताई सोनार, संगीता ताई जाधव, अश्विनी ताई जाधव, कल्पनाताई साळुंखे, सावित्री ताई राठोड, नाना शिंदे, रघु कोळी, प्रशिक कदम, सोनू अहिरे, कुणाल पाटील, गणेश पाटील, किरण मोरे, बाळा जाधव, जिल्हाध्यक्ष पोलीस बॉईज स्वप्निल वैधकर गणेश पाटील, प्रतिभा पाटील,अनिता ताई शिंदे ,गणेश भाऊ, अमोल पाटील, अमोल भाऊ चौधरी, रवी चौधरी. कुमावत समाज सेवा संघ चाळीसगाव तालुका अध्यक्ष रामेश्वर कुमावत, कैलास कुमावत, रोशन चव्हाण,अजय पाटील, मुकेश कुमावत,तन्मय राठोड यांनी रक्तदान केले. रक्तदात्याचे आभार सविता ताई कुमावत यांनी मानले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेंद्र सातपुते यांनी केले.