पाचोरा – पाचोरा येथील हडसन जिल्हा परिषद शाळेत जागतिक वृक्ष संवर्धन दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले असून वृक्षारोपण जिल्हा परिषद सदस्य पदमसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला
या वेळेस प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे माजी सभापती तथा सदस्य बन्सीलाल पाटील, गटविकास अधिकारी अतुल पाटील, गटशिक्षण अधिकारी विकास पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी समाधान पाटील, सरपंच दिपाली पाटील, शालेय समिती अध्यक्ष चंद्र सिंग पाटील, सुरेश पाटील, राजेंद्र पाटील देविदास पाटील, हीरालाल पाटील, माजी सरपंच शरद पाटील ,साईनाथ सोनवणे, संजय पाटील, ज्ञानेश्वर पाटील, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर किरण पाटील, निंबा पाटील, रामचंद्र पाटील, ईश्वर पाटील, केंद्रप्रमुख धीरज पाटील, मुख्यद्यापक दिलीप पाटील, उपशिक्षिका तारावती नन्नवरे ग्रामस्थ उपस्थित होते शाळेला वॉल कंपाऊंड उत्कृष्ट काम झाल्यामुळे शाळेच्या आवारात वृक्ष लागवडीची संकल्पना केंद्र गटशिक्षण अधिकारी विकास पाटील यांनी मांडल्याने मुख्याध्यापक दिलीप पाटील यांच्या सूचन ने लोकवर्गणीतून संपूर्ण आवारात विविध जातींचे वृक्ष लागवड करण्यात आली.