पाचोरा प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शहर अध्यक्षपदी अमोल झेरवाल यांची नियुक्ती खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या हस्ते देण्यात आली.
राज्य पत्रकार संघाचे पाचोरा येथील विभागीय कार्यालयात आज दि. २७ जुलै रोजी झेरवाल यांना नियुक्ती देण्यात आली यावेळी वरिष्ठ सल्लागार नितीन पाटील, खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या हस्ते देण्यात आली,
यावेळी विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, तालुका उपाध्यक्ष अनिल आबा येवले, ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष नगराज पाटील, विभागीय सचिव हेमंत विसपुते, कुंदन बेलदार, पाचोरा प्रसिध्दी प्रमुख निलेश मराठे आदींच्या उपस्थितीत नुतन शहराध्यक्ष अमोल झेरवाल यांना नियुक्ती पत्र देण्यात आला असून यावेळी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा ही देण्यात आले.