पारोळा प्रतिनिधी – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिर्मित एरंडोल येथील शिवसेना कार्यालयामध्ये विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांचा तर्फे छत्री वाटपचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी जिल्हा प्रमुख डॉ. हर्षल माने यानी मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि पक्षा पेक्षा कोणी ही मोठे नाही त्याचप्रमाणे पक्षाचा एक विचार एक झेंडा एक नेता या पेक्षा कोणी ही मोठे नाही त्यामुळे प्रत्येकाने फक्त शिवसेनिक म्हणूनच राहावे असे सांगितले तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अतिशय हिरारीने आलेल्या कठीण परिस्थितीचा सामना करून उभ्या महाराष्ट्राची सेवा करत आहेत.
त्यामुळे त्यांना दिर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करण्यात आली. तसेच उपतालुका प्रमुख रविंद्र चौधरी यांनी सर्व जुने कार्यकर्तांना एकच ठिकाणी बघून आनंद झाला असल्याचे सांगितले असून सर्वांनाच डॉ. माने यांनी बोलविले होते परंतु काही लोक स्वतः ला पक्ष पेक्षा मोठे समजतात है चुकीचे असल्याचे बोलवून दाखविलें.
या प्रसंगी उमार्दे येथील उपसरपंच संदीप पाटील यांचासह ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला रवींद्र जाधव, सुनील माणुधने, संजय खांडू महाजन, प्रसाद दंडवाते, रूपेश माली, अरुण महाजन, संदीप पाटिल, गजानान महाजन,गोपाल महाजन, महेश महाजन,भिका चौधरी,विनोद मराठी आदींची उपस्थिती होती.