जळगांव प्रतिनिधी – गेल्या 10 दिवसा पूर्वी महाराष्ट्र स्टुडंन्ट्स युनियन तर्फे आपणास व शिक्षण अधिकारी व शिक्षण सभापती जिल्हा परिषद ,जळगाव यांना खासगी शाळेच्या मनमानी फीस घेण्याच्या व फीस न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गातून काढून टाकल्याचा प्रकार आपल्याला निवेदनातून कळवला होता व त्या पासून विद्याथ्याना व पालकांना यातून दिलासा मिळाला अशी मागणी केली होती.
परंतु कुठलीच कारवाही झाली न होती जिल्हा प्रशासन ह्या कडे दुर्लक्ष करत होते त्या मुळे 23 रोजी अन्नत्याग साखळी उपोषण मासू कडून छेडण्यात आले होते. कोविड 19 च्या या पार्श्वभूमीवर जे आर्थिक संकट आले आहे. त्यात सामान्य माणूस होळपळून निघाला आहे. अशातच काही खासगीशाळा ह्या मनमानी पध्दतीने आधी ज्या प्रकारे फीस आकारात होते त्याच पद्धतीने आता आकारून त्यांची आर्थिक पिळवणूक करत आहे.
लाँकडाऊन मुळे गेल्या अडीच वर्षा पासून सर्वे काम घरूनच चालू आहे. ऑनलाईन लेक्चर्स चालू आहे.त्यात काही शाळा ह्या कोविड सुरू होण्या आधी जितकी फीस घेतात तेवढीच फी आता ही आकारत आहेत. पालकांनी का म्हणून इतर फीस द्यायची,तसेच फीस न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना काढले जात आहे अश्या या परिस्थितीत सर्व सामान्य पालक आपल्या पोटाला चिमटा घालून शाळेची इतकी फीस भरत आहे. तरी खासगी शाळांची ही अवाजवी फीस कमी करून फक्त ट्युशन फीस घ्यावी आणि विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांची ही आर्थिक गळचेपी थांववी अन्यतः महाराष्ट्र स्टुडंन्ट्स युनियन येत्या दोन दिवसात अन्यत्याग आंदोलनाची (आमरण उपोषण) करेल.
असा इशारा मासू कडून देण्यात आला होता त्यानुसार २३/७/२०२१ पासून आंदोलना करीत बसले होते ह्या आंदोलनाने जिल्हा प्रशासनाला काही प्रमाणात जाग आली व तात्काळ शिक्षण विभागाने दखल घेऊन काढले परिपत्रक काढले मासू चा मागण्या ह्या मान्य होऊन ह्या माध्यमांतून विद्यार्थी व त्यांचा पालकांना न्याय मिळाला आहे. सर्व मागण्या मान्य झाल्यानंतर मासूच्या उपोषण कर्त्यांना प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. अकलाडे तसेच शिवसेनेचे विष्णू भंगाळे, शरद तायडे, सरिता माळी यांनी शरबत देऊन उपोषणाची सांगता केली. ह्या उपोषणात विभागप्रमुख अभिजित रंधे यांचा नेतृत्वाखाली हे उपोषण पार पाडले दीपक सपकाळे, निलेश जाधव सामाजिक कार्यकर्ते, चेतन चौधरी,रोहन महाजन,सचिन बिऱ्हाडे संतोष भंगाळे, ललित पाटील यांचे मोलाचे योगदान लाभले