जळगाव – जळगाव शहर महानगरपालिकेत नगरसेविका असताना विविध राष्ट्रविकास व सामाजिक मूल्यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबवून आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या माजी नगरसेविका सौ अश्विनी विनोद देशमुख यांना सोशल सायन्स मधील कामगिरीच्या बळावर नेल्सन मंडेला नोबेल पीस अकॅडमी अमेरिका व अमेरिकन युनिव्हर्सिटी यांचेकडून डॉक्टरेट (सोशल सायन्स) पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.
पुणे येथील कोरिंथिअंस क्लब अँड रिसॉर्ट मधील हॉल येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध हॉकीपटू धनराज पिल्ले, पार्श्वगायक कुमार सानू, पार्श्वगायिका पलक मुच्छल, मेजर जनरल अजय पाल सिंग, कर्नल शैलेंद्र सिंग आदींना सुद्धा पुरस्कार व डॉक्टरेट देऊन सन्मानित करण्यात आले.
जळगाव शहर महानगरपालिकेच्या माजी महानगरपालिका नगरसेविका सौ. अश्विनी देशमुख यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ तथा प्रायमिनिस्टर वेल्फेअर स्कीम चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. श्री प्रल्हाद दामोदर मोदी यांच्या हस्ते नेल्सन मंडेला नोबेल पुरस्कार २०२१ यांच्या हस्ते तसेच ऑक्सफर्ड पार्लमेंट ऑफ वर्ल्ड चेरमन तथा चीफ रेक्टर प्रो. डॉ. मधु क्रीष्णन यांच्या हस्ते मानद डॉक्टरेट देण्यात आले व नेल्सन मंडेला नोबेल पीस अवॉर्ड २०२१ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोस्नियाचे राजदूत सुहास मंत्री नेल्सन मंडेला अकॅडमी ऑफ अमेरिका भारत देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार टाक, व्हाईस प्रेसिडेंट विजयसिंह पाटील, गव्हर्नर कन्वेअर बंडू वाघ यांच्यासह देशातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. डॉक्टरेट मिळाल्या बद्दल डॉ. अश्विनी विनोद देशमुख यांचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व खासदार वंदनाताई चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अभिनंदन केले.
डॉ. अश्विनी देशमुख यांनी केलेल्या कार्याचा तपशील:-
कचरा कुंडी मुक्त वार्ड:-
जळगांव शहर महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून काम करत असताना डॉ. अश्विनी विनोद देशमुख यांनी यांचा वार्ड संपूर्णपणे “कचरामुक्त” करून दाखवला विशेष म्हणजे संपूर्ण देशातील एकमेव व कचरामुक्त वार्ड करून दाखविणाऱ्या डॉ. अश्विनी देशमुख यांचे राष्ट्रीय स्तरावर अनेकांनी कौतुक केले. यासाठी त्यांनी वार्डात पथनाट्य घेतले माहितीपत्रिका, कॉर्नर मिटिंग याद्वारे “लोकसहभागातून कचरामुक्त वार्ड” करता येऊन पर्यावरणाचे रक्षण करता येते हे डॉ. अश्विनी देशमुख यांनी सिद्ध करून दाखविले.
ब्लॅक आऊट:-
इंटरनेट, मोबाईल, टीव्हीच्या अतिवापरामुळे अनावश्यक विजेचा वापर होत असल्याचे लक्षात घेऊन डॉ. अश्विनी विनोद देशमुख यांनी आपल्या प्रभागात रोज सायंकाळी रोज एक तास वॉर्डातील नागरिकांना घरातील टीव्ही, फ्रिज, एसी, कुलर आधी सर्व विजेवर चालणारे उपकरणे बंद ठेवून ब्लॅकआऊट मोहीम यशस्वी करून दाखवले रोज एक तास वॉर्डातील नागरिकांनी घरातील वीज बंद ठेवल्यामुळे नागरिकांचे पुन्हा एकमेकांशी संवाद घडू लागला.
किचन वेस्ट मधून खत निर्मिती:-
प्रत्येक घरातील किचन मधून रोज भाजीपाल्याचा कचरा बाहेर पडत असतो हा कचरा घरातील अंगणात जमिनीवर खड्डा करून बुजविले अस आपल्याला साठ हजार रुपये बाजार मूल्य असलेले कंपोस्ट घरच्याघरी मिळू शकते व यातून कुटुंबाला लागणारा भाजीपाला अंगणातील पारस बागेतून तयार करून उत्पन्न घेता येऊ शकते हे स्वतः प्रयोग करून डॉ. अश्विनी विनोद देशमुख यांनी यशस्वी करून दाखविले.
जळगाव शहर महानगरपालिकेतील सभागृहातील लक्षवेधी कामगिरी:-
जळगाव शहर महानगरपालिका येथील सभागृहात नगरसेविका असताना डॉ. अश्विनी विनोद देशमुख यांनी शहरातील मूलभूत समस्यांवर आवाज उठवून अभ्यासपूर्ण मांडणी सातत्याने केली; शहराचे वैभव असलेल्या मेहरून तलावाचे सुशोभीकरण, स्वच्छता, प्रभाग निहाय कचरा वाहतूक व साफसफाई, स्वच्छते मधील अनियमितता याबाबत केलेला पाठपुरावा पुस्तक वाचन कट्टा सुरू करून ग्रंथ वाचनाची सुरुवात यासह अनुकंप तत्वावर व नोकरीपासून वंचित असलेल्यांना मनपा कामगारांच्या वारसांना न्याय देण्यासाठी प्रसंगी प्रशासनासोबत वाद-विवाद चर्चा, निवेदने, सभागृहात शहरातील प्रश्नांबाबत लक्षवेधी मांडणी व कामगिरी लोकप्रतिनिधी म्हणून केलेली आहे.