जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादांचा वाढदिवस म्हणजे कार्यकर्त्यांसाठी एक मोठी पर्वणीच असते. दादांचा वाढदिवस धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करण्यासाठी बारामतीपासून ते राज्याच्या कानाकोपऱ्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व प्रत्येक कार्यकर्ता प्रयत्नशील असतो.
जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यालय सचिव संजय चव्हाण हे गेल्या १३ वर्षांपासून अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे हॅण्डबुक प्रकाशित करीत असतात.
या ही वर्षी ना.अजितदादा यांच्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादी हॅण्डबुकची तेरावी आवृत्ती गृहमंत्री नामदार दिलीप वळसे पाटील, ग्रामविकास मंत्री नामदार जयंतराव पाटील, आरोग्यमंत्री नामदार राजेश टोपे यांच्या हस्ते मुंबई येथे प्रकाशित करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी कार्यालय सचिव संजय चव्हाण, अजय बढे, दिलीप चव्हाण, अनिल पाटील आदी उपस्थित होते.