जळगाव प्रतिनिधी । नराधम मामाने सोळा वर्षे केल्याची घटना घडली याप्रकरणी तालुका पोलीस स्थानकात नराधम मामा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नात्याला काळीमा फासणारी घटना जळगावातील एका गोडाऊन मध्ये घडली. १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या नातेवाईकांसह राहते. पिडीत मुलगी ही मध्यप्रदेशातील रहिवाशी असून जळगावात नातेवाईकांसोबत मिळेल ते काम करते. तिचा मामाने गोडावून जळगाव याने आठ दिवसांपुर्वी (तारीख माहित नाही) नात्याने भाची असलेल्या अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवत तिच्यावर अत्याचार केला. तसेच कुणाला सांगितले तर तुला जीवे ठार मारण्याची धमकी देवून शिवीगाळ व मारहाण केली.
याप्रकरणी संशयित आरोपी याच्या विरोधात काल गुरूवारी २२ जुलै रोजी तक्रार दिली. अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीला तालुका पोलीसात रात्री अटक केली आहे. पुढील तपास पोउनि. कल्याण कासार करीत आहे.