जळगाव – पाचोरा जळगाव रोडवरील शिरसोली रोडवरील मोहाडी शिवारात श्री गुलाबराव देवकर मल्टिस्पेशालिटी मेडीकल आणि आयुष हॉस्पिटल आज गुरूवार २२ जुलै रोजी सकाळी शुभारंभ करण्यात आला. कोरोनाचे नियमांचे पालन करून साध्यापध्दतीने आजपासून ओपीडीला सुरूवात करण्यात आली आहे. सोबतच आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबीराला नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असल्याची माहीती संचालक तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी दिली आहे.
अत्याधुनिक सोयी सुविधांसह ऑक्सीजन निर्मीती प्रकल्प
अत्याधुनिक सोयी सुविधांसह जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध झाले आहे. श्री गुलाबराव देवकर मल्टिस्पेशालिटी मेडीकल आणि आयुष हॉस्पिटल मध्ये अत्याधुनिक अतिदक्षता विभाग, मेंदुविकार, हृदय विकार, मधुमेह, नेत्ररोग विभाग, प्लॅस्टिक सर्जरी, मुत्र रोग शास्त्र, लॅप्रोस्कोपी सर्जरी, स्त्रीरो व प्रसुतीशास्त्र, जनरल जर्सरी, कॅन्सर सर्जरी, ऑर्थोपेडीक्स, बालरोग, ॲनेस्थेशिया, जळीत रूग्णांसाठी विशेष सुविधा, अत्याधुनिक पॅथोलॉजी लॅब, एक्सरे सोनोग्राफी, पेडीयाट्रीक सर्जरी, मेडीयाट्रीक इंटरनसिव केअर युनिट (PICU), पेडीयाट्रीक व्हॅन्टीलेटर आणि अत्याधुनिक ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प आदी सुविधा जनतेच्या सुवेधेसाठी उपलब्ध राहणार आहे.
मोफत आरोग्य शिबीराला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
दरम्यान आज राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आजपासून पुढील पंधरा दिवस म्हणजे पंधरवाडा गुरूवार २२ जुलै ते गुरूवार ५ ऑगस्ट २०२१ दरम्यान मोफत आरोग्य शिबीराला सुरूवात करण्यात आली आहे. मोफत आरोग्य शिबीराच्या पहिल्याच दिवशी नागरीक व रूग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी तज्ञ डॉक्टरांकडून गरीब व गरजूं रूग्णांची तपासणी केली जाणार आहे. यात ईसीजी, एक्स-रे, सोनोग्राफी, सीटी स्कॅन आदी व सर्व प्रकारच्या रक्ताच्या तपासण्यांमध्ये ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे या उपक्रमांतर्गत ऑपरेशनमध्ये देखील ५० टक्के सवलत मिळणार आहे. यासाठी गरीब व गरजू रूग्णांनी पंधरवाड्याच्या उपक्रमांतर्गत मोफत आरोग्य शिबीराचे लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केले आहे.