जळगाव – महाराष्ट्राच्या राजकारणात पहाटेच्या शपथविधीने खळबळ उडवली होती. अजितदादा पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी केल्याने राष्ट्रवादी फुटली. शरद पवार साहेबांवरील पुतण्याच्या निष्ठेबद्दल शंका उपस्थितीत करण्यात आली. मात्र पावरफूल पवार पुन्हा माघारी आल्याने आणि महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्राला लाभले. उपमुख्यमंत्री अजिदादांच्या याच निष्ठेविषय संभ्रम दूर करणारी जाहिरात जळगावचे राष्ट्रवादीमध्ये सक्रिय झालेले विनोद देशमूख आणी एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक मनोज वाणी या दोघांनी बॅनर, होर्डींगच्या माध्यमातून केली. शहरातील मुख्य चौकात असलेल्या या होर्डींवरील जाहिरात पाहून प्रत्येकाला थांबावेच लागत आहे.
‘त्या’…शपथविधीमुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात दादांच्या ‘निष्ठेबद्दल’ शंका उत्पन्न झाली होती.. मात्र आम्ही ठाम होतो. दादा एकवेळ राजकारण सोडतील. पण साहेबांवरील निष्ठा कधीच सोडणार नाहीत.. होर्डींगवरील या ओळी वाचल्यानंतर साहेबांविषयी अजितदादांचे आणि अजितदादांविषयी कार्यकर्ते यांचे असलेले ऋणाबंध अधोरेखित होतात. उपमुख्यमंत्री अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त असलेली ही जाहिरात जळगावच नाही तर सोशयमाध्यमातही सर्वाधिक लोकप्रिय ठरत आहे.
अजितदादा पवार हे राजकारणातील वेळ अचुक पाळणारे नेते असुन प्रत्येक शब्दाला ते जागतात. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारे आणि जनतेच्या अपेक्षापूर्तीसाठी झटणारे नेते असल्याचे सांगत वेळात वेळ काढुन भेट दिली आणी जाहिरातीचे कौतुक केल्याचे विनोद देशमुख व मनोज वाणी यांनी सांगितले आणि जनतेच्या प्रश्नांना सोडविण्यासाठी दादांना दिर्घायुष्य लाभो अशा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्यात.