भडगांव, प्रतिनिधी । वडजी येथील टी.आर.पाटील विद्यालय,इंग्लिश मेडिअम स्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात आषाढ़ी एकादशी वारीचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र शासन शिक्षण व क्रिडा विभाग आदेशान्वये समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे टी.आर.पाटील विद्यालय,इंग्लिश मेडिअम स्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात आषाढ़ी एकादशी वारीचे आयोजन करण्यात आले होते.सामाजिक,व्यवहारिक कौशल्य विकसित व्हावे.दिव्यांग बालकांचा आत्मविश्वास विकसित व्हावा या उद्देशाने जनजागृती वारकरी दिंडीत विद्यार्थी-विद्यार्थिनीं विट्ठल-रुख्मीणी,वारकरी वेशभूषा करून टाळ मृदुंगाच्या गजरात वाजत गाजत सहभागी झाले होते.मुख्याध्यापक डी.डी.पाटील,मा.प्र.मुख्याद्यापक बी.वाय.पाटील,पो.पा.के.ए.मोरे,जेष्ठ शिक्षक ई.एम.पाटील,सहशालेय सांस्कृतिक प्रमुख़ एस.जे.पाटील,नियोजन समिती अध्यक्ष जे.एच.पवार,वर्ग शिक्षकांसह सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी वृंद,विद्यार्थी,विद्यार्थीनी उपस्थित होते.सदर उपक्रमास चेअरमन नानासाहेब प्रतापराव हरी पाटील, गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशीसो,विस्ताराधिकारी गणेश पाटीलसो,केंद्रप्रमुख संजय न्याहिदेसो,रविंद्र सोनवणेसो यांचे मार्गदर्शन लाभले.