जळगाव – येथील रूह ते हीलाल कमिटीची एक महत्त्वपूर्ण मीटिंग सोमवारी संध्याकाळी जामा मसाजिद येथे मौलाना उस्मान कासमी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यात जळगाव शहरातील विविध मशीदचे आलीम ,उलमा व ट्रस्टी यांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम ईदगाह ट्रस्टचे सचिव फारुक शेख यांनी 2 जुलै च्या शासनाच्या नियमा प्रमाणे ईदउल उझहा बाबत च्या गाईडलाईन चे वाचन केले व शनिवारी पोलीस अधीक्षक सोबत झालेल्या सभेचा वृत्तांत सादर केला.
त्यानुसार या सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली व ईद-उल-अजहा हा सण शासकीय नियमाप्रमाणे साजरा करावा, इतर धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावत आता कामा नये व कोणत्याही स्वरूपात गर्दी करता कामा नये असे सर्वानुमते ठरले.
ईदची नमाज व प्रतिकात्मक कुर्बानी आपल्या घरी करण्याचे सुद्धा आव्हान करण्यात आले. मुफ्ती अतिकुर रहेमान यांनी ईद चे महत्व पटवून दिले तर मौलाना उस्मान कासमी यांनी दुआ केली
या बैठकीत जळगाव शहराचे शहर काजी मुफ्ती अतिक् उररहेमान, इदगाह ट्रस्ट अध्यक्ष वहाब मलिक, सचिव फारूक शेख,खजिनदार अशपाक बागवान,इक्बाल बागवान,रियाज मिर्झा,मुकीम शेख,जामा मस्जिद चे ट्रस्टी सय्यद चांद,अकसा मस्जिद चे इमाम मौलाना सलीक सलमान, मौलाना मौलाना मिनहाज,नगर सेवक रियाझ बागवान,इदगाह ट्रस्टचे अनिस शाह, ताहेर शेख, आदींची उपस्थिती होती.