यावल – यावल येथील महिलांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून महागाई विरोधात चुली पेटवा आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांनी चुलीवर पोळी, भजे, चहा व इतर स्वयंपाक करून या ठिकाणी निषेध व्यक्त केला.
जळगाव जिल्हाध्यक्ष ऍड.संदीप भैय्या पाटील यांच्या सूचनेनुसार प.स.कार्यालय समोर यावल तालुका आणि शहर काँग्रेस कमिटी तर्फे इंधन दरवाढ विरोधात महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष यावल रावेर तालुक्याचे आ. शिरीष चौधरी, जिप गटनेते तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आज चुली पेटवा आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंगबापू पाटील, प.स.गटनेते शेखर पाटील, अ. जा. काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा चंद्रकला इंगळे, शहराध्यक्ष कदिरखान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सेवा फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल, युवानेते वाढोड्याचे तरुण सरपंच संदीप भैय्या सोनवणे, कोरपावलीचे युवा सरपंच विलास अडकमोल, महेलखेडीच्या सरपंच शरिफा तडवी,नगरसेवक गुलाम रसूल, मनोहर सोनवणे, समीर खान, समीर मोमीन, बशीर तडवी, शेतकी संघाचे संचालक अमोल भिरुड, शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे, नईम शेख, तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह, सकलेन शेख, अय्युब खान, मंजूर खान,रहेमान खाटीक, विजय बंडू गजरे,विक्की गजरे, अरुण तायडे, शेख आसिफ, अभिषेक इंगळे, निसार भाई, बबलू गजरे, भूषण कोळी, लीलाधर सोनवणे, भैय्या अडकमोल, भीमराव इंधटे, अजय बढे,महिला भगिनी दुर्गा सोनवणे, सिंधु तायडे, पद्माताई तायडे, रजनी तायडे, अरुणा तायडे,शरिफा तडवी, सकिनाताई तडवी, शाहानुरताई तडवी, रुस्तुलताई तडवी, सरोजताई तडवी, नशिबा तडवी सहित असंख्य महिला पुरुष युवक आणि काँग्रेसचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होत.