जळगाव: अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. वाहनासह साडेपाच लाखांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जगदीश महादेव सोनवणे (३०), रा.भादोबा प्लॉट भाग, कानळदा यास ताब्यात घेण्यात आले आहे. शहरातील दुध फेडरेशन परिसरात एका चारचाकी वाहनातून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक गजानन बडगुजर यांना मिळाली, त्यानुसार त्यांनी प्रभारी अधिकारी विठ्ठल ससे, सहाय्यक पोलीस निरीक्षण गणेश बुवा, पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश बडगुजर, दिलीप पाटील, तेजस मराठे, योगेश इंधाटे यांच्या पथकासह ३१ ऑक्टोबर रोजी रात्री ही कारवाई केली.
वाहनात विमल पानमसाला, तंबाखू, केसरयुक्त विमल पानमसाला, गायछाप चुना असा एकूण ६८ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल होता. या मुद्देमालासह पाच लाख रुपये किंमतीचे वाहन असे ५ लाख ६८ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.