एरंडोल – किशोर पाटील कुंझरकर आणि जयश्री पाटील हे शिक्षक दाम्पत्य शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोग करून सातत्याने सकारात्मक कार्य करून पुढाकार घेत आहेत.
जळगाव जिल्ह्यातील आदिवासी वस्ती वर खेडोपाडी गाव पाड्यावर ज्याठिकाणी पालकांजवळ स्मार्टफोनची संख्या नाही अशा ठिकाणी ऑनलाइन शिक्षणातील अडचणी दूर करण्यासाठी आणि शिक्षण सुरू ठेवण्यासाठी एरंडोल तालुक्यातील आदिवासी वस्ती वरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिल्ल वस्ती गालापूर चे शिक्षक किशोर पाटील कुंझरकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी तथा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक गालापुर तालुका एरंडोलशाळेच्या शिक्षिका श्रीमती पुरुषोत्तम पाटील यांना चर्चेतून सुचलेला विद्यार्थ्यांच्या घरोघरी त्यांच्या अंगणात जाऊन शिक्षणाचे धडे देण्याचा घर घर शाळा शाळा शिक्षण आपल्या दारी हा प्रयोग बघता बघता राज्यात अनुकरणीय आणि कौतुकास्पद उपक्रम ठरला आहे.
जून पासून त्यांनी सुरू केला आणि बघताबघता सोशल मीडिया व इतर माध्यमातून तसेच शिक्षण विभाग व इतर जणांनी वाढवलेल्या उत्साहाने राज्यात सर्वत्र अनुकरणीय ठरल्याने टीव्ही चॅनेल, जय महाराष्ट्र, टीव्ही नाईन, लोक राज्य सर्व दैनिक आदीसह सर्व क्षेत्रातून त्यांचे राज्यभरातून कौतुक व अभिनंदन होत आहे. सर्व पक्षीय, सर्व जातीय सर्वांमध्ये सहभागी होऊन सर्वांना मानवता आणि शिक्षण विचार पटवून देणारे किशोर पाटील कुंझरकर यांचे कार्य सामाजिक शैक्षणिक बांधिलकी जोपासणारे आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनाताई प्रल्हाद पाटील यांनी विशेष पत्र पाठवून या शिक्षक दाम्पत्याचे कौतुक केले असून एरंडोल मतदार संघाचे आमदार आबासाहेब चिमणराव पाटील यांनी देखील विशेष पत्र पाठवून कठीण काळात पुढे येऊन शैक्षणिक सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून राबवलेल्या या कार्यातून एरंडोल तालुक्याचे राज्यात नाव उंचावल्याने या शिक्षक दाम्पत्याचे अभिनंदन केले आहे.शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड,
पालक मंत्री गुलाबराव पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे,खासदार उन्मेष पाटील,आमदार चिमणराव पाटील, आमदार लताताई सोनवणे, आमदार गिरीश महाजन,पारनेर आमदार निलेश लंके,आमदार विक्रम काळे, किशोर दराडे, सुधीर तांबे,माजी आमदार डॉक्टर सतीश अण्णा पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद भाऊपाटील, शिक्षण सभापती रवींद्र भाऊ पाटील, जि प सदस्य नानाभाऊ महाजन ,शशिकांत साळुंखे, सत्यजित तांबे, माजी आमदार डॉक्टर सतीश अण्णा पाटील, रवींद्र भैय्या पाटील, संदीप भैय्या पाटील, गुलाब राव वाघ, भानुदास विसावे,महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणेचे संचालक डॉक्टर दिनकर पाटील, शिक्षण संचालक द गो जगताप,
शिक्षण आयुक्त डॉक्टर विशाल सोळंकी, शिक्षण सचिव वंदना कृष्णा,पूर्व शिक्षण महाराष्ट्राचे सचिव श्री नंदकुमार,सहसंचालक दिनकर टेमकर , पूर्व शिक्षण संचालक डॉक्टर गोविंद नांदेडे,विभागीय उपसंचालक नितीन उपासनी , पोपट तात्या भोळे, पंचायत समितीचे सभापती अनीलभाऊ महाजन व सर्व सदस्य, एरंडोल शहराचे नेते शालिक भाऊ गायकवाड,माजी नगर अध्यक्षराजेंद्र आबा चौधरी, नगराध्यक्ष रमेश परदेशी, जिल्हापरिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी बी एस अकलाडे, भास्कर पाटील,
विजय पवार, राजेंद्र सपकाळे, डॉक्टर डी एम देवांग,शाळा सिद्धि निर्धारक आसिफ शेख, राजेंद्र सपकाळे, गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील शिक्षण विस्ताराधिकारी जेडी पाटील, सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी,शाळा व्यवस्थापन समिती आदिवासी वस्ती तसेच ग्रुप ग्रामपंचायतचे गाला पुर सर्व पदाधिकारी राज्यातील शिक्षण विभागाच्या शिक्षक संघटनेच्या राज्य समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी,वेध ग्रुप , मित्रपरिवार ,शिक्षक संघटना, पत्रकार सामाजिक साहित्य संघटना पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा देऊन या शिक्षक दांपत्याचा कोरोना काळात राबवलेल्या शैक्षणिक उपक्रमाबद्दल अभिनंदन करून उत्साह वाढवला आहे.