जळगाव, प्रतिनिधी – जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वर्डी गावा जवळ हेलिकॉप्टर कोसळण्याची दुर्दैवी घटना घडल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे , या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमा झाली असून मदत कार्याला सुरुवात झाली आहे. चोपडा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तळ ठोकून असून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.
दरम्यान, चोपडा तालुक्यातील वर्डी गावाच्या जगलात मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी जंगल परिसरात धाव घेतली, गावकरी घटनास्थळी दाखल झाले असता चक्क हेलिकॉप्टर अपघात ग्रस्त झालेंल्या अवस्थे मध्ये दिसून आले यामध्ये पायलट जागीच ठार झाला असून एक महिला यामध्ये गंभीर जखमी झाली आहे.