Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

कौटुंबिक वादातून दोन्ही गटात जोरदार हाणामारी, दोन जण जखमी

by Divya Jalgaon Team
July 16, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला

जळगाव प्रतिनिधी । शहरातील एस पी कार्यालय येथे कौटुंबिक वादातून दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याची घटना आज दुपारी घडली. या घटनेत दोन जण जखमी झाले आहे.

कौटुंबिक कलहातून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याची घटना आज पोलीस अधिक्षक कार्यालयातील महिला दक्षता समितीच्या कार्यालयासमोर दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. जामनेर तालुक्यातील वाकोद येथील तरूणीचा विवाह औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील तरूणाशी चार महिन्यांपुर्वी झालेला आहे. सुरूवातीचे दोन महिने संसार चांगला चालला. त्यानंतर दोघांमध्ये खटके उडाले. त्यानंतर संबंधित तरूणीने जळगाव येथील महिला दक्षता समितीकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार आज तारखेला दोन्ही गटातील मंडळी पोलीस अधिक्षक कार्यालयात जमली होती. हेडकॉन्स्टेबल मनीषा पाटील, अभिलाषा मनोरे, एनपीसी संगीता पवार यांनी दोन्ही कुटुंबांचे म्हणणे ऐकून घेतले.

महिला दक्षता समितीतील कामकाज आटोपल्यानंतर बाहेर पडल्यानंतर दोन्ही कुटुंबियांमध्ये वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत फायटर सारख्या वस्तूचा देखील वापर झाला. हा प्रकार घडल्यानंतर येथील पोलिस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली व वाद मिटविला. या हाणामारीत दोन जण गंभीर जखमी झाले आहे. दोघांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Share post
Previous Post

वावडदा येथे शिवसंपर्क अभियान

Next Post

चोपडा तालुक्यातील वर्डी गावाजवळ हेलिकॉप्टर कोसळले ; एक जखमी 

Next Post
चोपडा तालुक्यातील वर्डी गावाजवळ हेलिकॉप्टर कोसळले ; एक जखमी 

चोपडा तालुक्यातील वर्डी गावाजवळ हेलिकॉप्टर कोसळले ; एक जखमी 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group