मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ,जळगाव जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांची संवाद आढावा बैठक पार पडली. यावेळी पक्ष निरीक्षक अविनाश आदिक यांनी पक्ष संघटनेच्या विविध आघाड्या , अभियान यांचा पक्ष पदाधिकारी यांचेकडून आढावा घेतला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाअध्यक्ष रविंद्र भैय्या साहेब पाटील, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर, माजी आमदार अरुण दादा पाटील, युवक आघाडी जिल्हा अध्यक्ष रवींद्र नाना पाटील, जिल्हा बँक संचालक संजय पवार, योगेश देसले,महिला आघाडी मंगला ताई पाटील, ओ बि सी आघाडी जिल्हा अध्यक्ष उमेश नेमाडे,व्हि जे एन टी सेल जिल्हा अध्यक्ष अरविंद चितोडीया,बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील, ईश्वर रहाणे, प्रवक्ता सेल रावेर लोकसभा प्रमुख विशाल महाराज खोले, युवक जिल्हा उपाध्यक्ष पवन पाटील, माजी सभापती दशरथ कांडेलकर, राजेंद्र माळी, विलास धायडे,सोशियल मीडिया सेल जिल्हा अध्यक्ष शिवराज पाटील,दिलीप माहेश्वरी, माफदा तालुका अध्यक्ष रामभाऊ पाटील,माजी जि प सदस्य सुभाष पाटील,तालुकाध्यक्ष यु डी पाटील, महिला आघाडी तालुकाध्यक्ष रंजना ताई कांडेलकर, युवक आघाडी तालुका अध्यक्ष शाहिद खान, महिला आघाडी शहराध्यक्ष निता ताई पाटील, युवती आघाडी तालुका अध्यक्ष आम्रपाली पाटील,ओबीसी आघाडी तालुका अध्यक्ष साहेबराव पाटील,मागासवर्गीय सेल तालुका अध्यक्ष नंदकिशोर हिरोळे, लिलाधार पाटील, शहर अध्यक्ष अशोक नाईक,सरचिटणीस रवींद्र दांडगे, सोपान दुट्टे, कल्याण पाटील,डॉ बि सी महाजन, चंद्रकांत बढे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्तविक करताना रोहिणी खडसे म्हणाल्या गेल्या आठ महिन्यापूर्वी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तेव्हा पासून आमच्या सोबत प्रवेश करणारे कार्यकर्ते आणि जुने कार्यकर्ते सर्व एकदिलाने पक्षाचे कार्य करत आहोत त्याचाच भाग म्हणून पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका मध्ये पक्षाला घवघवीत यश प्राप्त झाले,आमची बुथ रचना वन बुथ टेन युथ रचना सुरू असुन लवकरच पूर्ण करून येत्या जि प, प स समित्या निवडणुकीत त्याचा लाभ होणार असुन सर्व पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते एकदिलाने काम करून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकात मुक्ताईनगर मतदारसंघ पुर्णपणे राष्ट्रवादीमय करून दाखवू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्या मुळे नाथाभाऊ यांच्या मागे ईडी लागली परंतु नाथाभाऊ या सर्व बाबींना पुरून उरतील तुमचे सर्वांची साथ, आशिर्वाद त्यांच्या सोबत आहेत
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष रवींद्र भैय्या साहेब पाटील म्हणाले मुक्ताईनगर मतदारसंघ हा कायम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असून गेल्या तीस वर्षापासून नाथाभाऊ यांच्या समवेत संघर्ष करत आलेलो आहे परंतु सर्व मतभेद विसरून नाथाभाऊ यांचे सर्व प्रथम मी पक्षात स्वागत केले त्याप्रमाणे आपण पण सर्व एकमेकां मध्ये काही मतभेद असतील तर ते विसरून एकदिलाने पक्षाचे कार्य करा आता नाथाभाऊ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्यामुळे पक्षात नवचैतन्य संचारले असुन मुक्ताईनगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल तसेच येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि सहकारातील सर्व निवडणुकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निर्विवाद यश मिळेल. जो पक्ष विरोधी कार्य करेल त्याची पक्षात गय केली जाणार नाही त्याच्या वर कार्यवाही करण्यात येईल.
सरकारच्या माध्यमातून आपण अपुर्ण राहिलेले विकास कामे पूर्ण करू त्यासाठी नाथाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली मी ,रोहिणीताई नेहमीसाठी प्रयत्नशील आहोत आमचा त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. यावेळी अध्यक्षीय भाषणात मनोगत व्यक्त करताना पक्ष निरीक्षक अविनाश आदिक म्हणाले एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाने पक्षाला उत्तर महाराष्ट्र मध्ये बळ मिळाले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या सर्व निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळेल व जळगाव जिल्हा परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला बनेल यात कोणतीही शंका नाही. रोहिणीताई खडसे यांनी पक्ष प्रवेशापूर्वी जो घडयाळ घातलेला फोटो सोशियल मीडिया वर टाकला होता तेव्हांपासून आम्ही तुमचे कार्य बघत आहे तुम्ही नेहमी विविध उपक्रम राबवित असतात ते कौतुकास्पद आहेत.
येत्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असुन त्यांना ताकदीने सामोरे जायचे आहे त्यासाठी पक्ष संघटन मजबुत करा आपल्या जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार यांची नियुक्ती झाली असुन येत्या काही दिवसात त्यांचा जळगाव दौरा असून त्या दौऱ्यापूर्वी राहिलेल्या पक्षाच्या सर्व आघाड्यांचे सेलचे गठन करा. तुमच्या नव्या जुन्या कार्यकर्त्यां मधील एकोपा ,उत्साह बघुन मुक्ताईनगर मतदारसंघावर निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल. पक्षाचे ध्येय धोरणे, सरकारचे निर्णय समाजातील शेवटच्या घटका पर्यंत पोहचवून त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून द्या पक्ष कायम तुमच्या पाठीशी आहे