पाचोरा प्रतिनिधी – जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा शिवमती माधुरी भदाणे यांच्या आदेशानुसार डॉ. सुनीता मांडोळे यांची विभागीय संघटक पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी पी. एच. डी. संपादन केल्याबद्दल ही जिजाऊ ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्षा डॉ .सुलभा कुंवर विभागीय अध्यक्षा डॉ.उषाताई साळुंखे व मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड पदाधिकारी आदींनी त्यांच्या यावेळी सत्कार केला.
महिलांनी आत्मनिर्भर व्हावे यासाठी महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश पदाधिकारी शिवमती डॉ सुलभा कुंवर प्रदेश उपाध्यक्षा, जिजाऊ ब्रिगेड शिवमती डॉ.उषा साळुंखे विभागीय अध्यक्षा जिजाऊ ब्रिगेड ,शिवमती सिमा वाघ तालुकाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड धुळे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनेने झाली. यावेळी सुलभा कुवर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना महिलांनी संघटित होऊन अंधश्रद्धा व कर्मकांड यातून मुक्त होऊन निर्भय व्हावे. घराघरातून महिलांचा आदर व सन्मान व्हावा असे सांगितले.
विभागीय अध्यक्ष डॉ. उषा साळुंखे यांनी कुटुंब व्यवस्था आज मोडकळीस निघालीय, आज ऑनलाईनचे युग आहे आपली मुलं मोबाईलवर काय करतात याकडे महिलांनी लक्ष देणे गरजेचे आहे, तसेच महिलांना व्यवसायाविषयी ही मार्गदर्शन केले. तसेच ८ मार्च २०२१ला सुरू झालेल्या सुवर्णपंख अँप विषयी माहिती दिली.