जळगाव, प्रतिनिधी । शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील नेत्रज्योती चॅरिटेबल हॉस्पिटल येथे आजपासून ऑर्थोपेडिक व स्त्रीरोग तपासणी विभागाची माजी आ. गुरुमुख जगवानी यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली आहे.
याप्रसंगी ट्रस्ट चे व्हॉ. चेअरमन दिलीपकुमार मंघवाणी, सेक्रेटरी डॉ. मूलचंद उदासी, कोषाध्यक्ष शंकरलाल थोरानी, मनोहरलाल जाधवानी , धनराज चावला , रमेशलाल मंधान आदी उपस्थित होते. ऑर्थोपेडिक विभागात अस्थिरोग तज्ञ डॉ. शौनक रमाकांत पाटील, एमएस (ओर्थो) FARJS (जर्मनी), एक्स. केईएम हॉस्पिटल, मुंबई आणि गायनेक विभागात स्त्रीरोग तज्ञ डॉ. योगिता शौनक पाटील, एमबीबीएस, डीजीओ, DARM & DMIGS (जर्मनी), एक्स. केईएम हॉस्पिटल, मुंबई हे सायंकाळी ४ ते ६ या वेळेत तपासणी करतील. सदर सेवेचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांना लाभ घेता येईल असे ट्रस्टचे पदाधिकाऱ्यांनी कळवले आहे. सदर प्रसंगी नेत्ररोग तज्ञ डॉ. अल्विन राणे, डॉ. शिरीष पाटील, जनरल फिजिसियन डॉ. मोहनलाल साधरिया आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हॉस्पिटल अडमिनीस्त्रेटर डॉ. सुचंद्र चंदनकार, नितीन झोपे, राजेंद्र कुवर, जया रेजडा व सर्व स्टाफ यांनी परिश्रम घेतले.