Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

कौशल्य विकास कार्यक्रमाने मनुष्यबळाची कमतरता पूर्ण होईल : अधिष्ठाता डॉ. रामानंद

‘शावैम’मध्ये जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कार्यक्रम

by Divya Jalgaon Team
July 15, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन
0
कौशल्य विकास कार्यक्रमाने मनुष्यबळाची कमतरता पूर्ण होईल : अधिष्ठाता डॉ. रामानंद

जळगाव, प्रतिनिधी । वैद्यकीय सेवेत सतत शिकत राहावे लागते, कारण नवीन तंत्रज्ञान विकसित होत असते. कोरोना महामारीशी सर्व जग लढा देत आहेत. याकाळात कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत होती. ती कमतरता मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम कार्यक्रमामुळे नक्कीच पूर्ण होईल. हा पायलेट प्रोजेक्ट जर यशस्वी झाला तर हा पॅटर्न संपूर्ण भारतभर राबविता येईल, असे प्रतिपादन अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गुरुवार, १५ जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. वैद्यकीय क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी व्यावसायिक प्रशिक्षण संस्था म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावची निवड झाली असून याअंतर्गत जनरल डयुटी असिस्टंट हा ३० विद्यार्थी प्रवेशक्षमता असलेला पहिला अभ्यासक्रम सुरु झाला आहे. या विद्यार्थ्यांसाठी पंकज व्यवहारे यांचे व्याख्यान औषधशास्त्र विभागाच्या परिवर्तन सभागृहात आयोजित करण्यात आले होते. मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे कौशल्य विकास अधिकारी मिलिंद भा.देशपांडे होते.

यावेळी बोलताना पंकज व्यवहारे म्हणाले की, कौशल्य मिळविण्यासाठी स्वतःला मानसिकदृष्ट्या व ज्ञानाने परिपूर्ण ठेवावे लागते. सतत अद्ययावत राहून आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करता येते. प्रत्येकाच्या जीवनात कौशल्य महत्वाचे आहे. युवकांनी कौशल्य मिळविण्यासाठी त्यांच्या अंगभूत गुणांना विकसीत करणे गरजेचे आहे. आपले सामर्थ्य ओळखून जीवनात जिददीने यश मिळवावे, असेही ते म्हणाले.

प्रस्तावनेत कौशल्य व उद्योजकता प्रशिक्षण केंद्राचे जिल्हा समन्वयक महेश चौधरी यांनी कार्यक्रमाविषयी माहिती दिली. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक दीपक बोरसे, दत्तात्रय रिठे, महाविद्यालयातील डॉ. श्रीकृष्ण चव्हाण, डॉ. सोनाली मुपाडे, डॉ. श्रद्धा पाटील यांच्यासह प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते.

Share post
Previous Post

लहान बालकांना न्युमोनिया प्रतिबंधक मोफत लसीकरणास सुरूवात

Next Post

पावसाळ्यात भूक लागल्याशिवाय जेवू नये – डॉ. शाल्मी खानापूरकर

Next Post
पावसाळ्यात भूक लागल्याशिवाय जेवू नये – डॉ. शाल्मी खानापूरकर

पावसाळ्यात भूक लागल्याशिवाय जेवू नये - डॉ. शाल्मी खानापूरकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group