रावेर, प्रतिनिधी । ग्रॅज्युएटी रक्कम बँक खात्यात जमा करण्याच्या मोबदल्यात कनिष्ठ लिपिक आज लाचलुचपत विभागाच्या पथकाच्या जाळ्यात अडकला आहे. याप्रकरणी लिपिका विरुद्ध रावेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
तक्रारदार यांचे वडील रावेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या ग्रॅज्यूएटीची रक्कम ३ लाख ९१ हजार ७१० रूपये बँक खात्यात जमा करण्याच्या मोबदल्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ लिपीक शेख वसीम शेख फयाज (वय-३०) रा. मदिन कॉलनी रावेर याने २ हजार रूपये आणि अर्जीत रजेची येणारी रक्कत बँक खात्या जमा करण्यासाठी ५०० असे एकुण अडीच हजार रूपयाची लाचेची मागणी केली. ही मागणी संशयित आरोपीने पंचासमोर केली. त्यानुसार संशयित आरोपी कनिष्ठ लिपीक शेख वसीम शेख फयाज याला लाचलुचपत विभागाने अटक केली आहे.