जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका परिसरात चक्क पोलिसालाच धमकी देणाऱ्यावर शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील प्रजापत नगर येथे रहिवासी असलेले सागर महारू सपकाळे असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. सागर सपकाळे बुधवारी १४ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता शहर पोलीस ठाण्याच्या आवारात येवून पोलीसांना धमक्या देवून मला १०० रूपये द्या नाहीतर इथेच आत्महत्या करतो असे बोलून स्वत:च्या अंगावर ब्लेडने वार करून जखमी करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
यावेळी शहर पोलीसांनी समजविण्याचा प्रयत्न केला परंतू पोलीसांनाच शिवीगाळ व धमकी देवून दमबाजी केली. पोलीस हेडकॉन्स्टेबर रविंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक भिमराव नांदूरकर करीत आहे.